माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे हे षडयंत्र – नविनचंद्र बांदिवडेकर – eNavakal
निवडणूक महत्वाच्या बातम्या राजकीय

माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे हे षडयंत्र – नविनचंद्र बांदिवडेकर

रत्नागिरी – माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे म्हणजे हे एक षडयंत्र असून यामागे शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा हात असल्याचा थेट आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी केला आहे. आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बांदिवडेकर यांनी याचा उलगडा केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, काँग्रेसच्या विधान परिषद आमदार हुस्नबानो खलिफे, राजीव किर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आघाडीकडून रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नवीनचंद्र बांदीवडेकरांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर काहीच दिवसांत बांदीवडेकरांचा संबध थेट सनातनशी असल्याचा आरोप झाला आणि सोशल मिडियावरही बांदीवडेकर ट्रोल झाले. नेटिझन्सनी काँग्रेस आणि बांदिवडेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. काँग्रेसचा उमेदवार सनातनचा समर्थक? असा थेट आरोप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनीही बंदीवडेकरांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती.

काँग्रेस  हायकमांडकडने देखील बांदिवडेकरांकडे स्पष्टीकरण मागितले होते. मात्र सनातनशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत केवळ समाज म्हणून आपण त्यावेळी तिथे गेलो असल्याचं बांदिवडेकरानी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे एवढया सर्व घडामोडीनंतर काँग्रेसने बांदिवडेकरांची उमेदवारी कायम असल्याचं जाहीर केलं.

एकूणच या वादानंतर बांदिवडेकरानी आज पहिल्यांदाच रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सर्व षडयंत्र असल्याचा आरोप केला. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि स्वाभीमान पक्षाला आपली उमेदवारी डोईजड जाईल म्हणून माझा सबंध थेट सनातनशी जोडला गेला. यामागे शिवसेना आणि स्वाभिमानचा हात असल्याचा थेट आरोप नवीनचंद्र बांडीवडेकरांनी केला.

माझं तिकिटंच कापलं जावं हा यामागे विरोधकांचा उद्देश होता.तसेच एवढं करूनही उमेदवारी कायम राहिली तर काँग्रेसची जी पारंपारिक मतं आहेत ती बांदिवडेकरांपासून दूर जावीत हाही यामागे विरोधकांचा उद्देश होता असा आरोप बांदिवडेकरानी केला आहे. 30 मार्च रोजी आपण आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आज स्पष्ट केलं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बीडच्या 15 गावातील विदारक चित्र

बीड – जिल्ह्यातील वडवली तालुक्यात शेतकर्‍यांचे विदारक चित्र दिसत आहे. दोन महिन्यांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने पिके करपत चालली आहेत. त्यामुळे तालुक्यातील 15 गावातील...
Read More