मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी – eNavakal
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत मराठीच नव्हे तर हिंंदी सिनेसृष्टीतही आपलं अस्तित्व सिद्ध केलं होतं. मात्र, क्रोनिकल लीवर डिसीसने त्यांना मृत्याने कवटाळले.

निशिकांत काम यांचा जन्म १७ जून १९७० मध्ये मुंबईतील दादर येथे झाला. ते अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. २००४ मध्ये त्यांनी हवा आने दे या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातूनच त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी सिनेमातही कामं केली. मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीवर राहिलेला सातच्या आत घरात या चित्रपटात त्यांनी अभिनय तर केलाच होता, शिवाय त्यांनी या चित्रपटाचं लेखनही केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांचं अभिनयात मन रमलं नाही. त्यांना दिग्दर्शनाचं क्षेत्र खुणाावू लागलं. त्यामुळे त्यांनी आपलं लक्ष दिग्दर्शनावर वळवलं. त्यामुळे अगदी कमी वेळात त्यांनी स्वतंत्रपणे सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली.


मराठी चित्रपटसृष्टीत डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं, या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांंत कामत यांनीच केलं होतं. या चित्रपटामुळे कामत लाईमलाईटमध्ये आले. घराघरात या मराठी दिग्दर्शकाला ओळख मिळाली. या सिनेमालाही प्रचंड यश मिळालं. अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. डोंबिवली फास्ट या सिनेमानंतर कामत यांचा यशाचा आलेख वाढत गेला. मराठीत आपलं नाव कमावल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपला मोर्चा वळवला. तसंच, त्यांनी २००७ साली एक तामिळ सिनेमाही दिग्दर्शित केला होता.


२००८ मध्ये त्यांनी मुंबई मेरी जान हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपटही तुफान चालला. या चित्रपटानेही त्यांना ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या ४०४ या सिनेमातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, तसेच या सिनेमात त्यांनी अभिनयही केेला. सोबतच, २०११मधअये त्यांनी जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असलेला फोर्स सिनेमाचंही निशिकांत कामत यांनीच दिग्दर्शन केलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावला होता. या सिनेमाने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.


मराठी, हिंदी सिनेमात त्यांची घो़डदौड सुरू असतानाच त्यांनी २०१५ साली दृश्यम चित्रपट केला. या चित्रपटामुळे त्यांची प्रचंड वाहवा झाली. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. यानंतर २०१६ मध्ये जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. याशिवाय इरफान खान स्टारर मदारी आणि अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनच्या भावेश जोशी सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता.

निशिकांत सध्या दरबदर या त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत होते. २०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अजून पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सिनेमांशिवाय रंगबाज फिर से आणि फायनल कॉल या दोन टीव्ही प्रोग्रामचेही निशिकांत निर्माते होते.

निशिकांत यांना मिळालेले पुरस्कारर

निशिकांत यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. २००६ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच या सिनेमासाठी फिल्मफेअरचा बेस्ट क्रिटिक अवॉर्डही मिळाला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार ३९१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – राज्यात आज नव्या ११ हजार ३९१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आज ८ हजार ४९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील धार्मिक स्थळं सुरू होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

अहमदनगर – राज्यातील मंदिरे सुरू व्हावीत अशी सर्वच स्तरांतून मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करण्यास हिरवा कंदील अद्यापही मिळालेला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन

न्यू जर्सी – पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. भारतीय शास्त्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील बदल्यांची सीआयडी चौकशी करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू-चंद्रकांत पाटील

पुणे -कोरोना काळात राज्यात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी अशी मागणी...
Read More