खुर्ची सिनेमातून उलगडणार राजकारणातील डावपेच – eNavakal
मनोरंजन

खुर्ची सिनेमातून उलगडणार राजकारणातील डावपेच

सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. खुर्ची साठी होणाऱ्या राजकारणाची झलक आपण याआधी ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि ‘धुरळा’सारख्या चित्रपटांमधून पाहिली. सत्तेच्या अभावी जाऊन सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पहायला मिळाले. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये खुर्ची साठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे. या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर, आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांची सहनिर्मिती असून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शविणारा आहे. गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे.

ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

खुर्ची सिनेमातून उलगडणार राजकारणातील डावपेच

सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यपालांकडून संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर

मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव...
Read More
post-image
मनोरंजन

संजय दत्तच्या ‘बाबा’ची फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये बाजी

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये मराठी चित्रपट ‘बाबा’ ने सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वश्रेष्ठ कथा आणि सर्वश्रेष्ठ फिल्म क्रिटिक्स अशा 3 मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

संजय राठोडांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उपसरपंच निवडीवरुन सांगलीत शिवसेनेच्या सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचे दोघे जखमी; भाजपच्या कार्यकर्त्यांवर खुनाचा आरोप

सांगली – जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. यानिमित्तान ग्रामपंचयात निवडणुकांमधील गावपातळीवरील...
Read More