जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती ठरलेले चितेत्सु वतनाबे आहेत तरी कोण? – eNavakal
ट्रेंडिंग विदेश

जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती ठरलेले चितेत्सु वतनाबे आहेत तरी कोण?

जगात प्रेत्यक व्यक्तीला काहीना ना काही तरी दुःख असतंच. मात्र अशा परिस्थितीतही सतत आनंदी राहण्याचा ध्यास अंगी बाळगणारे व्यक्ती जगात क्वचितच सापडतील. पण हे खरंच आहे की, आनंदी राहिल्याने बऱ्याच अडचणींचा सामना करता येतो. शिवाय दीर्घायुष्यही लाभतं, असं म्हणतात. जपानमध्ये असेच एक वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांच्या आनंदी राहण्याच्या वृत्तीने त्यांना दीर्घायुष्य दिलं आहे. चितेत्सु वतनाबे असे या वृद्धाचे नाव असून सध्या ते जगातील सर्वात वयस्कर पुरुष ठरले आहेत. १२ फेब्रुवारी २०२० ला त्यांनी वयाची ११२ वर्षे ३४५ दिवस पूर्ण केले आहेत. तर त्यांच्या या दीर्घायुष्याची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. चितेत्सु वतनाबे यांच्या कायम आनंदी राहण्याच्या वृत्तीने अनेकांना प्रेरणा दिली असून सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने आज आपण जगातील सर्वात वयस्कर ठरलेल्या चितेत्सु वतनाबे यांच्याविषयी माहिती घेऊ.

चितेत्सु वतनाबे कोण आहेत ?

चितेत्सु वतनाबे यांचा जन्म ५ मार्च १९०७ साली जपानमधील निगीता येथे झाला. चितेत्सु हे आठ भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. चितेत्सु यांना सुरुवातीपासूनच वृक्षरोपणाची प्रचंड आवड आहे. याकरता त्यांनी आपला अभ्यासही कृषी विषयात केला. कृषी शाळेतून पदवी घेतल्यानंतर ते तैवान या ठिकणी गेले. तिथे ते उसाची शेती करू लागले. १८ वर्षे त्यांनी तैवानमध्ये काढली असून येथेच त्यांचे लग्नही झाले. त्यांना पाच मुलं आहेत. उसाची लागवड या व्यतिरिक्त चितेत्सु यांनी १९४४ साली पॅसिफिक युद्धाच्या समाप्तीदरम्यान सैन्यातही काम केलं आहे. युद्धानंतर चितेत्सु आपल्या मूळ गावी निगिताला परतले. येथे त्यांनी एका कृषी कार्यलयात निवृत्तीपर्यंत काम केलं. पंरतु निवृत्त झाल्यानंतर घरी राहून आराम करणाऱ्यांपैकी चितेत्सु मुळीच नव्हेत. १९७४ साली चितेत्सु आणि त्यांचा मुलगा टेट्सुओ यांनी नवीन घर बांधलं होतं, जिथे एक एकर जमीन होती. या एक एकर जमिनीवर चितेत्सु यांनी फळझाडांची लागवड केली. यामध्ये स्ट्रॉबेरी, टोमॅटो, बटाटे आदींच्या लागवडीचं काम त्यांनी वयाच्या १०४ वर्षापर्यंत सांभाळलं.

चितेत्सु यांना ‘बोनासाई’ (मोठ्या झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती) या प्रकारच्या वृक्ष लागवडीची ही आवड आहे. यासाठी त्यांनी १०० बोनासाई झाडांची लागवड केली होती. २००७ साली एका स्थानिक प्रदर्शनात त्यांनी आपली लागवड केली हि वृक्ष प्रदर्शनात ठेवली होती. त्यांची आजवरची कारकिर्दी ही कृषी क्षेत्रात अधिक आहे.

दीर्घायुषी राहण्याचं रहस्य

चितेत्सु यांचा ११२ वर्षांचा हा प्रवास खरंच अनेकांना प्रेरणा देणारा आहे. ‘रागवू नका आणि नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवा’, या त्यांच्या सकारत्मक ऊर्जेमुळे चितेत्सु यांना दीर्घायुष्य लाभलं आहे. त्यांच्यातील पूर्वीसारखा सर्क्रियपणा आता कमी झाला असला तरी त्यांच्या आनंदी वृत्तीमुळे अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळत आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More