#KalankTeaser ‘कलंक’ नही, ‘इश्क’ है! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

#KalankTeaser ‘कलंक’ नही, ‘इश्क’ है!

मुंबई – बहुचर्चित मल्टीस्टारर ‘कलंक’ चित्रपटाचे टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाचा आहे. दोन मिनिटे आणि ५ सेकंदाच्या या टीझरमध्ये चित्रपटातील सर्व पात्र आणि भव्यदिव्य सेट पाहायला मिळत आहे. टीजरमधील वरूण धवनने म्हटलेला डायलॉग, ‘रिश्ते कर्जों की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है’ मनाला भिडतो. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे कथानक या चित्रपटाचे आहे. ‘कलंक’ची कहाणी १९४० च्या दरम्यानची असल्याचे समजते. मात्र, हा टीझर पाहत चित्रपटाचे कथानक अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More