प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेबसिरीज ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू – eNavakal
मनोरंजन

प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेबसिरीज ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू

प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच ‘जॉबलेस’च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भुमिकेत असणार आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो, अशी या सिरीजची कथा आहे. सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो, त्यातून तो जितकं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या दलदलीत अडकत जातो, ही कथा काही अंडरवर्ल्डची नाही, परंतु, ज्या पद्धतीची गुन्हेगारी या सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे ती मराठी प्रेक्षकांनी या आधी क्वचितच कुठल्या सिनेमात किंवा वेबसिरीजमध्ये अनुभवली असेल.

या वेबसिरीजविषयी प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”जॉबलेसचा विषय हा क्राईम थ्रिलर जॉनरचा आहे, एक चुकीचा निर्णय कसा आयुष्याची राखरांगोळी करू शकतो आणि तो मोहाचा क्षण कसा भुरळ घालू शकतो, अशी काहीशी या वेबसिरीजची कथा आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांना एका जबरदस्त क्राईम थ्रिलरचा नक्कीच अनुभव देईल, या कथेविषयी फारसं सांगणं म्हणजे स्पॉयलर ठरेल, मात्र ही सीरीज प्रेक्षकांना नक्कीच शेवटपर्यंत बांधून ठेवू शकेल, एवढं मी नक्कीच सांगू शकतो”.

ही वेबसिरीज सात भागांची असून याचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केलंय. तर, अमित बैचे, पिनाक बडवे, श्रीपाद दीक्षित, क्षीतिज कुलकर्णी यांनी निर्मात्याची तर सिद्धार्थ राजाराम घाडगे यांनी असोसिएट प्रोड्युसरची धुरा सांभाळली आहे. सुनील खरे हे डीओपी असतील. ही वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेबसिरीज ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू

प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच ‘जॉबलेस’च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसिरीज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जीएसटीच्या कक्षात आल्यास पेट्रोल ७५, डिधेल ६८ रुपयांवर येऊ शकतं, एसबीआयचा अहवाल

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. विविध राज्यात विविध कर पद्धती असल्याने इंधन दरात वाढ होतेय. मात्र, पेट्रोल आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IND vs ENG: नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अश्विन आणि अक्षर पटेल यांचा जलवा, भारताचा दणदणीत विजय

अहमदाबाद – टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत (india vs england 2021 4th) टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी  विजय झाला आहे. अश्विन आणि अक्षर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘मनसुख हिरेन यांचा मृतदेह पालथा पडलेला, मास्कच्या आत सात-आठ रुमाल कोंबलेले’

ठाणे – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह चिखलात पालथा पडला होता. त्यांच्या तोंडात सहा ते...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

“सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?,” चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई – पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातही ठाकरे सरकारला सवाल विचारले आहेत. मागील काही घटनांचा...
Read More