तनिष्कच्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं, अॅडगुरू भरत दाभोळकर यांचं परखड मत – eNavakal
Uncategoriz ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

तनिष्कच्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं, अॅडगुरू भरत दाभोळकर यांचं परखड मत

मुंबई – ज्वेलरी ब्रॅण्ड असलेल्या तनिष्कची एक जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा ठपका या जाहिरातीवर ठेवण्यात आला आहे. मात्र, तनिष्कच्या त्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं परखड मत अॅडगुरु भरत दाभोळकर यांनी व्यक्त केलं आहे.  एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भरत दाभोळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

वाचा – राज्यात सर्वत्र मुसळधार! शेतकरी हवालदिल, शहरी भागही पाण्याखाली; पुढील तीन दिवस चिंतेचे

तनिष्कने जी जाहिरात केली आहे ती गेल्या दशकांमधल्या ज्या चांगल्या जाहिराती आहेत त्यापैकी एक जाहिरात आहे. या विरोधात काहीही प्रोटेस्ट होणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ‘मी ही जाहिरात केली असती तर समाधानी असतो’ असं ही जाहिरात विश्वात एक प्रतिक्रिया दिली जाते. तशीच प्रतिक्रिया मला तनिष्कच्या या जाहिरातीबाबत द्यावीशी वाटते की मी ही जाहिरात केली असती तर आनंद झाला असता. लोकांना लॉकडाउनमध्ये खूप वेळ आहे.. त्यामुळे मूर्खपणाची एक प्रतिक्रिया देऊन ही जाहिरात ट्रोल होते आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे यामध्ये लव्ह जिहाद असं काहीही नाही. मुस्लिम कुटुंबातली सासू हिंदू सुनेचं कौतुक करते आहे यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? असाही प्रश्न भरत दाभोळकर यांनी विचारला आहे.

वाचा  मेट्रो आणि ग्रंथालयं उद्यापासून सुरु होणार, सरकारकडून महत्वाचे निर्णय जाहीर

काय आहे तनिष्कची जाहिरात?
मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोकं हिंदू प्रथांप्रमाणे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतात असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये या तरुणीचे लग्न झालं आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

Sharing is caring!

1 Comment
  1. shyren monday धाबोळकर 1 min ago
    Reply

    धाबोळकर,आपण जगातले जास्तीचे हुशार अतिशहाणे आहात,पण दुसऱ्यांची स्वतःची मते असतात,सगळ्याच गोष्टीत मलाच जास्त कळत,ह्या भ्रमात राहू नका .

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
गुन्हे महाराष्ट्र मुंबई

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीला मारली मिठी, आरोपीला बेड्या

कल्याण – टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नादंप येथील खासगी शिकवणी क्लासेसमधील अल्पवयीन मुलीचा खासगी  शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली.  टिटवाळा पूर्वेतील नादंप...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधेश्याम’मधील ‘प्रेरणा’; पूजा हेगडेचा फर्स्ट लूक प्रदर्शित

मुंबई – ‘राधेश्याम’, युरोपमध्ये घडणारी ही प्रेमकथा म्हणजे एक महाकाव्य आहे. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत....
Read More
post-image
देश

डबघाईला आलेल्या एमटीएनल आणि बीएसएनल कंपन्यांसाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – डबघाईला आलेल्या बीएसएनल आणि एमटीएनल या सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व केंद्रीय मंत्रालये, सार्वजनिक विभाग आणि सार्वजनिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आम्ही तोंड उघडलं तर फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, ’ शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक

मुंबई – राज्य सरकारकडून धार्मिक स्थळे सुरू होण्याबाबत दिरंगाई होत असल्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्ऱ्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून राज्यात सध्या जोरदार...
Read More
post-image
Uncategoriz ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

तनिष्कच्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं, अॅडगुरू भरत दाभोळकर यांचं परखड मत

मुंबई – ज्वेलरी ब्रॅण्ड असलेल्या तनिष्कची एक जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा ठपका या जाहिरातीवर ठेवण्यात आला आहे. मात्र, तनिष्कच्या...
Read More