महाराष्ट्र बचाव आंदोलन: पंकजा मुंडे अजूनही नाराज? राजकीय वर्तुळात चर्चा – eNavakal
महाराष्ट्र

महाराष्ट्र बचाव आंदोलन: पंकजा मुंडे अजूनही नाराज? राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – भाजपमध्ये अद्यापही नाराजी नाट्य सुरू असल्याचे समोर आले आहे. कारण, भाजपने आज पुकारलेल्या मेरा आंगण, मेरा रणांगण या आंदोलनात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सहभाग नोंदवला नाही. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे या आंदोलनात सहभागी झाले, मात्र पंकजा मुंडे यांनी या आंदोलनात कोणताही सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

वाचा – राज्य सरकारकडून अंग चोरून मदत, राज्याने आर्थिक पॅकेज जाहीर करावं- फडणवीस


विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर विधानपरिषदेसाठी त्यांना तिकिट मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र. त्यांची ही अपेक्षा पक्षश्रेष्टींकडून फोल ठरवण्यात आली. शिवाय, पक्षातील ज्येष्ठांना डावलून, नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ खडसेंनीही त्यांची नाराजी उघड उघड बोलून दाखवली होती. त्यामुळे आजच्या आंदोलनात भाजपचे किती नेते सहभागी होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलं होतं.


माजी मंत्री विनोद तावडे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात आंदोलन केले. तर, प्रा. राम शिंदे यांनी चौंडी येथील स्वत:च्या घराबाहेर राहून आंदोलन छेडले. जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनीही घरासमोर आंदोलन केले. तर, नागपूरमधील कामठी तालुक्यात कुराडी गावात बंगल्यसमोर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आंदोलन केले. मात्र या सगळ्यात पंकजा मुंडे यांचा सहभाग कुठेच दिसला नाही.

वाचा – उद्धवा अजब तुझे सरकार, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडेसही आंदोलनात सामिल

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More