राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर नाही, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची माहिती – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर नाही, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची माहिती

अयोध्या – अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर केला जाणार नाही, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. या मंदिरासाठी तांबे मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे दानशूरांनी तांबे दान करावे, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

अयोध्येतील राम मंदिर बांधकामासाठी लार्सन आणि टुब्रो व आयआयटीच्या अभियंत्यांची मदत घेतली जात आहे. मंदिराच्या बांधकामात दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. याशिवाय मंदिराच्या बांधकामात तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याने तांबे दान करा, असे आवाहन त्यांनी केले. ऊन, वारा, पाऊस याचा कोणताही परिणाम मंदिरावर होणार नाही. दगडांच्या वयानुसार, मंदिर किमान एक हजार वर्षे टिकेल. असा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मंदिराच्या जागेवरील मातीची तपासणी करताना आयआयटी चेन्नईचा सल्ला घेतला. ६० मीटर खोल मातीची तपासणी केली. भूकंपाच्या लहरींचा सामना जमिनीची माती किती सहन करील, याचाही शोध घेण्यात आला. राम मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे तीन एकर असेल. मंदिराच्या बांधकामासाठी १० हजार तांब्याची पाने आणि रॉड लागणार आहेत. त्यासाठी दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर नाही, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची माहिती

अयोध्या – अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर केला जाणार नाही, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली....
Read More
post-image
देश

जीमेलचं सर्व्हर डाऊन, फाईल्स शेअरिंग खोळंबले

संदेशवहनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे गुगल जीमेल आज ठप्प झाले होते. म्हणजेच जीमेलचे सर्व्हर डाऊन झालं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. ईमेल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोविड सेंटरच्या उभारणीत महापौरांकडून भ्रष्टाचार, मनसेचा आरोप

मुंबई – कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच, आजचा भाव पाहा

मुंबई – जागतिक लॉकडाऊनमुळे कमॉ़डिटी बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतोय. ५६ हजाराच्या जवळपास गेलेल्या सोन्याची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

आजमगड – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच...
Read More