#IPL2019 हार्दिकच्या तुफानी खेळीने मुंबई ‘विजयी’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

#IPL2019 हार्दिकच्या तुफानी खेळीने मुंबई ‘विजयी’

मुंबई – हार्दिक पांड्याने फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ५ गडी राखून पराभूत केले आहे. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. तर बंगळुरुचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढे या सामन्यात पाहायला मिळाले.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सलामी दिली. पहिल्या सहा षटकांमध्ये मुंबई दहाच्या सरासरीने धावा केल्या. पण त्यानंतर मात्र मुंबईला रोहित शर्मा आणि क्विंटन डी’कॉकच्या रुपात दोन धक्के बसले. रोहितने २८ तर  डी’कॉकने ४० धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने ९ चेंडूंत २१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव संघाचा डाव सावरला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्यादेखील 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या धमाकेदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.

दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून बंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं. बंगळुरूने मोईन अली-एबी डिव्हीलियर्स यांनी काढलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 7 बाद 171 धावांची मजल मारली. सामन्यातील शेवटच्या टप्प्यात मलिंगाने झटपट तीन बळी घेतल्यामुळे बंगळुरूला मोठी धावसंख्या आणखी उभारता आली नाही. कर्णधार शर्माने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. डिव्हीलीयर्स 75 आणि मोईन अली 50 धावा यांच्या अर्धशकांमुळेच बंगळुरूला 150 धावांचा टप्पा गाठता आला. इतर फलंदाजांनी मात्र निराशाच केली. कर्णधार विराट अवघ्या 8 धावा काढून बाद झाला. डिव्हीलीयर्स मोईन अलीने तिसर्‍या विकेटसाठी 95 धावांची भागिदारी करून त्यांचा डाव सावरला. सलामीची जोडी पटेल-कोहली 49 धावांतच माघारी परतले. त्यानंतर या दोघांनी सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली. अली-डिव्हीलीयर्सने फटकेबाजी करून मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढविला. मलिंगाने 31 धावांत 4 बळी टिपले.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More