#IPL2019 राजस्थानचा कोलकातावर ३ गडी राखून विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 राजस्थानचा कोलकातावर ३ गडी राखून विजय

कोलकाता – ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कोलकाता-राजस्थान सामन्यात कोलकत्याच्या हातातोंडाशी आलेला घास राजस्थान रॉयल्सच्या रायन परागने हिरावला. रायन पराग आणि तळात जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्सला तीन गडी राखून निसटता विजय मिळवता आला. कर्णधार कार्तिकच्या फलंदाजीने कोलकता संघाने 6 बाद 177 धावा केल्या होत्या. राजस्थान संघाने 19.2 षटकांत 7 बाद 177 धावा केल्या.

कोलकताने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव अडखळतच सुरू होता. अजिंक्‍य रहाणे, संजू सॅमसन स्थिरावल्यानंतर बाद झाले. कर्णधार स्टिव्ह स्मिथ झटपट बाद झाला. पण, रायन पराग आणि जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या फटकेबाजीने राजस्थानला विजयाला गवसणी घालता आली. पराग रसेलच्या गोलंदाजीवर हिटविकेट बाद झाला. पण, तोवर त्याने 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांत षटकारांची आतषबाजी करत आर्चरने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 12 चेंडूंत नाबाद 27 धावा केल्या.

त्यापूर्वी, कर्णधार दिनेश कार्तिकने केलेल्या झुंजार 97 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर कोलकाताने 20 षटकांत 6 बाद 175 धावांची मजल मारली. राजस्थानचा कर्णधार स्मिथने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला राजस्थानसाठी फायदेशीर ठरला. राजस्थानचा अर्धा संघ 119 धावांतच माघारी परतला. पण कार्तिकने एक बाजू लावून धरताना कोलकाताला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने आयपीएलमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. 50 चेंडू खेळताना त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. राजस्थानतर्फे अ‍ॅरोनने 2 बळी घेतले. रसेल अवघ्या 14 धावा काढून बाद झाला. सुरुवातीला त्याला जीवदानदेखील मिळाले होते. पण त्याचा फायदा रसेल घेऊ शकला नाही. कोलकातातर्फे राणाने 21, गिल-रसेलने 14 धावा केल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More