#IPL2019 मुंबई पराभवाचा बदला घेणार का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

#IPL2019 मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचा आज समारोप होत असून माजी विजेता मुंबईचा संघ आज वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या आपल्या शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या पाहुण्या कोलकाता संघाचा पराभव करून मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.या लढतीत विजय मिळवून मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल 2 क्रमांकांमध्ये आपले स्थान निश्‍चित करू शकतो.

मुंबई-कोलकाता यांच्यात कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत कोलकात्याने बाजी मारली होती. 232 धावांचे मोठे लक्ष्य मुंबईला गाठता आले नव्हते. हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करून 91 धावांची शानदार खेळी करून मुंबईच्या विजयाच्या आशा पल्‍लवित केल्या होत्या. पण तो बाद झाला आणि कोलकात्याचा विजय निश्‍चित झाला. हा पराभव मुंबई संघाला जिव्हारी लागला असेल. त्यामुळे आता त्या पराभवाची परतफेड करण्यास मुंबईचा संघ सज्ज झाला आहे.

कोलकात्यासाठी ही लढत जिंकू किंवा मरू अशीच आहे. त्यांचा पराभव झाल्यास कोलकात्याचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गुणतालिकेत ते 5 व्या क्रमांकावर असून त्यांचे 12 गुण झाले आहेत. हैदराबाद संघाकडून त्यांना धोका असून त्यांनीदेखील ही लढत जिंकल्यास हैदराबादलादेखील स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यात प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. गेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून स्पर्धेतील 8 वा विजय मिळवून गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली.

स्पर्धेचा पहिला टप्पा जरी संपत असला तरी मुंबईच्या फलंदाजांची समस्या अद्याप कायम राहिली आहे. त्यांच्या स्टार फलंदाजांना सातत्याने चांगली कामगिरी करता आलेली नाही. 13 लढतीत कर्णधार शर्माला अवघे 1 अर्धशतक काढता आले आहे. सूर्यकुमार यादव, पोलार्ड यांनी चांगलीच निराशा केली आहे. सलामीवीर डिकॉकने मात्र सातत्याने चांगली फलंदाजी करून मुंबईची एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. तर अष्टपैलू हार्दिक पांड्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. त्याच्या फटकेबाजीमुळे मुंबईला काही सामने जिंकता आले. मुंबईच्या विजयात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. बुमराह, मलिंगा, पांड्या बंधू, चहर, मार्कंडे या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे.

बुमराहने कठीण समयी मुंबईला नेहमीच तारले आहे. शेवटचा सामना जिंकण्यासाठी कोलकाता संघ जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही. सलामीवीर गिल, लीन, कार्तिक, रसेल यांना लवकर बाद करण्यासाठी मुंबईला नवी व्यूहरचना आखावी लागेल. यंदाच्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात मुंबईचा संघ घरच्या मैदानावर दिल्‍लीकडून पराभूत झाला होता. पण आता पहिल्या टप्प्यातील शेवटच्या सामन्यात विजयाने समारोप करण्यात मुंबईचा संघ सज्ज झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More