#IPL2019 मुंबई इंडियन्स ठरले ‘किंग्स’! चेन्नईवर दणदणीत विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPL2019 मुंबई इंडियन्स ठरले ‘किंग्स’! चेन्नईवर दणदणीत विजय

चेन्नई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत चेन्नई-मुंबई या दोन बलाढ्य संघातील लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काढलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला. त्यापाठोपाठ अंबाती रायडू शून्यावर त्रिफळाचीत झाला. केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने ६ धावा केल्या. नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.

चेन्नईचे पाच फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते. त्यानंतरही चेन्नईचे धक्का सत्र कायम राहिले.  एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या. मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो झेलबाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ब्राव्हो २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोणीही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर स्थिरावला नाही.

प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईने 20 षटकांत 4 बाद 155 धावांची मजल मारली. धोनीच्या गैरहजेरीत चेन्नईचे नेतृत्व करणार्‍या सुरेश रैनाने नाणेफेक जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजी दिली. त्याचा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून मुंबईला मोठी धावसंख्या करू न देता सार्थचे ठरवला. कर्णधार शर्माने 48 चेंडू खेळताना 6 चौकार आणि 3 षटकार मारून 67 धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच अर्धशतक होते. त्याला लुईसने 32 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 23 धावा काढून चांगली साथ दिली. चेन्नईच्या सॅन्टनरने 2 बळी घेतले. ताप असल्यामुळे धोनीने या सामन्यात विश्रांती घेतली. तर सलग 97 सामने खेळल्यानंतर रवींद्र जडेजाशिवाय चेन्नईचा संघ आज मैदानात प्रथमच उतरला. या सामन्यात पांड्या आणि चहर बंधुंनी जोडी खेळत होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More