#IPL2019 मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक विजय – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPL2019 मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक विजय

हैदराबाद- मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा शानदार चौकार मारला. आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आज मुंबईचा ठरला. यंदाच्या हंगामात सलग चौथ्यांदा मुंबईने बलाढ्य चेन्नई संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. निर्णायक सामन्यात रोमहर्षक लढतीत अवघ्या एका धावेने मुंबईने चेन्नईला नमवून चौथ्यांदा जेतेपदाची मोहर आयपीएल चषकावर उमटवली. मलिंगाने सामन्यातील शेवटच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या चेन्नई संघाला यंददेखील जेतेपद राखण्यासाठी मुंबईने 150 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली. पण प्रथम फलंदाजीचा निर्णय फारसा मुंबईला फायदेशीर ठरला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करून मुंबईला 50 षटकांत 8 बाद 149 धावांवर रोखण्यात यश मिळविले. दबावाखाली आणि धोनीच्या सुरेख नेतृत्वामुळे मुंबईची मधली फळी कोसळली. शर्मा-डीकॉक जोडीने मुंबईला 45 धावांची चांगली सलामी करून दिली. दीपक चहरच्या दुसर्‍याच षटकांत डीकॉकने 3 षटकार मारून तब्बल 20 धावा फटकावल्या. मुंबईच्या डावांतील याच षटकांत सर्वाधिक धावा निघाल्या. तर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चहरचे सर्वात महागडे षटक होते. पण तरीदेखील डीकॉक बाद झाल्यानंतर पुन्हा कर्णधार धोनीने त्याच्याचकडे चेंडू सोपविला. मग त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा महत्त्वाचा बळी घेऊन चेन्नईला मोठे यश मिळवून दिले.

त्याअगोदर डिकॉकला ठाकूरने 29 धावांवर बाद करून मुंबईला पहिला धक्‍का दिला. शर्मा डिकॉक जोडी माघारी परतल्यानंतर मुंबईची घसरगुंडी सुरू झाली. गेल्या सामन्यात मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलणार्‍या सूर्यकुमार यादवचा 15 धावांवर त्रिफळा उडविला. तर कृणाल पांड्याचा शार्दुल ठाकूरने आपल्याच गोलंदाजीवर धावत जाऊन अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर आलेल्या पोलार्डनेच मुंबईतर्फे सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. त्याने 25 चेंडू खेळताना 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. हार्दिक पांड्या या सामन्यात मात्र मोठी खेळी करू शकला नाही. त्याला चहरने 16 धावांवर पायचीत पकडले. चेन्नईतर्फे चहरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर इम्रान ताहिरने प्रत्येकी 2 बळी घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More