#IPL2019 मुंबईचा ‘सुपर’ विजय; प्ले-ऑफमध्ये प्रवेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

#IPL2019 मुंबईचा ‘सुपर’ विजय; प्ले-ऑफमध्ये प्रवेश

मुंबई – आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ‘सुपर ओव्हर’मध्ये हैदराबादवर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि 13 सामन्यांमधून आठ सामन्यामध्ये विजय मिळवत 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. सामन्यात आणि सुपर ओव्हरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले.

सुपर ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता होती. आक्रमक फलंदाज हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्या 2 चेंडूत 3 धावा काढत मुंबईला विजय मिळवून दिला. त्याआधी मुंबई इंडियन्सने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहाने चांगली सुरुवात केली होती. पण साहा चौकार लगावण्याच्या प्रयत्नात १५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २५ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर सलामीवीर मार्टिन गप्टिलला १५ धावांवर बुमराहने पायचीत पकडले. त्यापाठोपाठ कर्णधार विल्यमसन कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. विजय शंकर १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला. हैदराबादचे गडी बाद होत असताना मनीष पांडे आणि मोहम्मद नबीने फटकेबाजी करून सामन्यात रंगत आणली. शेवटच्या चेंडूवर ७ धावा हव्या असताना मनीष पांडेने षटकार लगावून सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढतीत पाहुण्या हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईला 162 धावांत रोखण्यात यश मिळविले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्याचा हा निर्णय मुंबईला फारसा फायदेशीर ठरला नाही. हैदराबाद संघाने केलेली शिस्तबद्ध गोलंदाजी आणी सुरेख क्षेत्ररक्षण यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईच सुरुवातदेखील खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 24 धावा काढून खलिल अहमदचा शिकार ठरला. त्याने 18 चेंडू खेळताना 5 चौकार मारले. त्यानंतर आलेल्या यादवने डिकॉकला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करून मुंबईचा डाव सावरला.

खलील अहमदने पुन्हा यादवला बाद करून हैदराबादला दुसरे यश मिळवून दिले. यादवने 17 चेंडू खेळताना 3 चौकार आणि 1 षटकार मारून 23 धावा काढल्या. यादव बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईची घसरगुंडी उडाली. लुईस 1, हार्दिक पांड्या 18, पोलार्ड 10 धावा काढून झटपट बाद झाले. सलामीवीर डिकॉकने मात्र पुन्हा एकदा एक बाजू लावून धरत दमदार अर्धशतकी खेळी केली. 58 चेंडू खेळताना त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारून 69 धावा केल्या. कृणाल पांड्या 9 धावा काढून नाबाद राहिला. हैदराबादतर्फे खलील अहदमने 3 बळी घेतले. तर राशीद खानने 4 षटकांत अवघ्या 21 धावा दिल्या. मुंबईने मागील सामन्यातील आहे तोच संघ कायम ठेवला. तर हैदराबादने आपल्या संघात गुप्टिल आणि थंपीला स्थान देऊन देवी, शर्माला वगळले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More