#IPL2019 कोलकाताचा मुंबईवर ३४ धावांनी विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPL2019 कोलकाताचा मुंबईवर ३४ धावांनी विजय

कोलकाता – ईडन गार्डन मैदानावर रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर ३४ धावांनी मात केली आहे. कोलकाताच्या शुभमन गिल, ख्रिस लीन आणि आंद्रे रसेलच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी २३३ धावांचा डोंगर उभा केला. हार्दिक पंड्याने ९१ धावा करत आव्हानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची झुंज अपयशी ठरली आणि मुंबईचा ३४ धावांनी पराभव झाला. आंद्रे रसेलला सामनावीराच्या खिताबाने सन्मानित करण्यात आले.

२३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. सुरुवातीपासूनच फटकेबाजी आवश्यक असल्याचे समजून घेत त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला. डावखुरा फलंदाज एवीन लुईस १५ धावा करून  झेलबाद झाला. हार्दिक पांड्याला संयमी साथ देणारा कायरन पोलार्ड २० धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील आजच्या दुसर्‍या लढतीत प्रथम फलंदाजी करताना यजमान कोलकाताने मुंबई विरुद्ध 20 षटकांत 2 बाद 232 धावांची मोठी मजल मारली. सलामीवीर गिल, लीन आणि रसेल यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे यंदाच्या या स्पर्धेतील कोलकाताने सर्वात मोठी धावसंख्या उभारली. संघ व्यवस्थापनाने या दोघांना दिलेल्या बढतीचा गिल-रसेलने पुरेपूर फायदा घेतला. सलामीत आलेल्या गिलने 45 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकार मारून 76 धावा फटकावल्या. त्याचा सहकारी लीनने 29 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकार मारून 54 धावा केल्या. तर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या रसेलने 40 चेंडूंत 6 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी करून नाबाद 80 धावा ठोकल्या. लीन-गिलने कोलकाताला 96 धावांची जोरदार सलामी करून दिली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. पण त्याचा हा निर्णय मुंबईला चांगलाच  महागात पडला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश

जम्मू काश्मिरमधील 370कलम हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानकडून जे जे प्रयत्न होत आहेत त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More