#IPL2019 आज मुंबई-हैदराबाद महत्त्वपूर्ण लढत – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPL2019 आज मुंबई-हैदराबाद महत्त्वपूर्ण लढत

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील आज वानखेडे होणारा यजमान मुंबई आणि पाहुणा हैदराबाद संघ यांच्यातील सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना या लढतीत विजय मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची आणि रंगतदार होईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. गुणतालिकेत चेन्‍नई आणि दिल्‍लीने अव्वल 2 क्रमांक मिळवून आपला प्ले ऑफमधील प्रवेश अगोदरच निश्‍चित केला आहे. तर आता तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई-हैदराबादमध्ये इतर 2 क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार चुरस आहे.

उभय संघात हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या लढतीत मुंबईने बाजी मारली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यास मुंबईचा संघ सज्ज झाला आहे. त्या लढतीत पदार्पणातच जोसेफने 6 बळी घेऊन हैदराबादची दाणादाण उडविली होती आणि मुंबईला नाट्यपूर्ण विजय मिळवून दिला होता. पण आता आज होणार्‍या लढतीत खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे जोसेफ खेळणार नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजीची ताकद थोडीशी कमी झाली आहे. मुंबईने आजची लढत जिंकल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित होईल. हैदराबादला त्यांचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज वॉर्नरची मोठी उणीव जाणवेल. यंदाच्या या स्पर्धेत वॉर्नरनेच आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. 600 पेक्षा जास्त धावा करणार्‍या वॉर्नरने 8 अर्धशतके आणि 1 शतक स्पर्धेत लगावले आहेत. परंतु आता तो ऑस्ट्रेलियाच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजीची ताकद नक्‍कीच कमी झाली आहे.

वॉर्नरच्या अगोदर त्यांचा दुसरा सलामीवीर बेअरस्टो वैयक्‍तिक कारणामुळे इंग्लंडला रवाना झाला आहे. आता या दोघांच्या गैरहजेरीत कर्णधार विल्यमसन, यष्टिरक्षक साहा, मनीष पांडे, दीपक हुडा यांना हैदराबादची फलंदाजी सांभाळावी लागेल. तर गोलंदाजीत भुवनेश्‍वर कुमार, नबी, राशिद खान यांच्यावर त्यांची मोठी मदार असेल. मुंबईचा शेवटचा सामना कोलकात्या विरुद्ध झाला होता. त्यात अवघ्या 31 धावांनी मुंबईला हार खावी लागली होती. कोलकात्याने 232 धावांचे मोठे लक्ष्य मुंबईसमोर ठेवले होते. हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता मुंबईच्या इतर फलंदाजांना सातत्याने चांगली कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्माने 12 लढतीत अवघे 1 अर्धशतक फटकावले आहे. तर फटकेबाज फलंदाज पोलार्डनेदेखील 12 लढतीत अवघी 2 अर्धशतके काढली आहेत.

मुंबईची फलंदाजीची चिंता संघव्यवस्थापनाला लागली आहे. त्यातच गोलंदाजदेखील तेवढे प्रभावी ठरलेले नाहीत. त्याचाच प्रत्यय कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात आला. कोलकात्याच्या गिल, लीन, रसेल यांनी मुंबईच्या गोलदाजांची चांगलीच धुलाई केली होती. आता गेल्या सामन्यातील चुका टाळून मुंबईचा संघ आपला खेळ उंचावेल, अशी अपेक्षा मुंबई संघाचे चाहते करत असतील. उभय संघात झालेल्या पहिल्या लढतीतील विजयाची पुनरावृत्ती करण्यास मुंबई संघ इच्छुक आहे. सरस धावगतीच्या जोरावर गुणतालिकेत मुंबई संघ तिसर्‍या क्रमांकावर आहे. उद्याच्या लढतीत फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये मुंबईने सुधारणा करणे गरजेचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More