#IPL2019 आज माजी विजेत्या मुंबईची सलामी दिल्लीशी – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

#IPL2019 आज माजी विजेत्या मुंबईची सलामी दिल्लीशी

मुंबई – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत माजी विजेत्या रोहित शर्माच्या मुंबई संघाची सलामीची लढत दिल्ली संघाशी होणार आहे. तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई संघ यंदा जेतेपदाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई संघाची गोलंदाजीची ताकद हार्दिक पांड्या आणि जसप्रित बुमराह या दोन गोलंदाजांवर राहणार आहे. विश्वचषक स्पर्धेला थोडा अवधी बाकी असताना मुंबई संघ व्यवस्थापन या दोन गोलंदाजांचा कसा वापर करणार हेदेखील बघणे महत्त्वाचे ठरेल.

हार्दिक पांड्याला पाठदुखापतीने त्रस्त केल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत तो खेळू शकला नव्हता. तर याच मालिकेत काही सामन्यांमध्ये बुमराहालादेखील विश्रांती देण्यात आली होती. या दोघांना जास्त गोलंदाजी देणे उचित ठरणार नाही, असे मुंबई संघाचे संचालक आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने सांगितले.

फलंदाजीची मदार कर्णधार रोहित शर्मा याच्यावर प्रामुख्याने राहणार आहे. मुंबई संघात यंदा प्रथमच खेळणारा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराजसिंगची कामगिरी कशी होते. ते बघणेदेखील महत्त्वाचे ठरेल. कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फार चमक दाखवू शकला नव्हता. तेव्हा आयपीएलमधील त्याच्या कामगिरीकडे निवड समिती सदस्यांचे लक्ष असेल. शर्मा बरोबरच युवराजसिंग, पोलार्ड, कटिंग आणि सुर्यकुमार यादव यांच्यावर फलंदाजीची मदार राहणार आहे.

अंबाती रायडूला या स्पर्धेत चमक दाखवून भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करता येईल. युवा फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडेच्या कामगिरीकडेदेखील निवड समितीचे लक्ष असेल. दिल्ली संघाने यंदा आपले नाव बदलले असून, शिखर धवनवर त्यांची मोठी मदार असेल. धवन व्यतिरिक्त फटकेबाजी फलंदाज यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि श्रेयश अय्यर हेदेखील दिल्ली संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. ईशांत शर्मा प्रथमच दिल्ली संघातर्फे या मौसमात खेळणार आहेत. त्याला बाऊल्ट, रबाडा आणि नथुसिंग यांची कशी साथ मिळते, हेदेखील बघणे महत्त्वाचे ठरेल. उभय संघातील पहिली लढत रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मलिंगा पहिल्या 6 सामन्यांना मुकणार

मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या 6 सामन्यांना मुकणार आहे. स्पर्धेदरम्यान श्रीलंकेत होणार्‍या सुपर वनडे स्पर्धेत तो खेळणार असल्यामुळे आयपीएलमधील पहिल्या 6 सामन्यात तो खेळू शकणार नाही. विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळविण्यासाठी श्रीलंकेचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी आयपीएलचे पहिले सहा सामने सोडण्यास आपण तयार असल्याचे मलिंगाने सांगितले. गतवर्षी त्याने गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले होते. यंदाच्या हंगामात मात्र तो पुन्हा एकदा खेळणार आहे. मुंबई संघाने 2 कोटी देऊन मलिंगाला पुन्हा करारबद्ध केले. न्यूझीलंड गोलंदाज अ‍ॅडम मिलनेदेखील दुखापतीमुळे स्पर्धेतून अंग काढून घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More