#IPL2019 आज कोलकाता-चेन्‍नई दोन बड्या संघात मुकाबला – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 आज कोलकाता-चेन्‍नई दोन बड्या संघात मुकाबला

चेन्‍नई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता-चेन्‍नई या दोन बड्या संघात मुकाबला रंगणार आहे. गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकून 8 गुण मिळवून अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविला. दोन माजी विजेत्यांमध्ये ही लढत जोरदार होणार यात शंका नाही. कोलकात्याचा जबरदस्त फॉर्मात असलेला फटकेबाज फलंदाज रसेलला चेन्‍नई संघ कसा रोखणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असेल.

रसेलने यंदाच्या या स्पर्धेत आपल्या तुफानी फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने आपल्या संघाला काही अशक्यप्राय विजय या स्पर्धेत मिळवून दिले आहेत. तसेच गोलंदाजीत चमक दाखवताना रसेलने काही महत्त्वाचे बळीदेखील टिपले. सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. कोलकाता आणि चेन्‍नई संघाला प्रत्येकी एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यंदाच्या मोसमात हे दोन बडे संघ प्रथमच आमनेसामने आज असणार आहेत. कागदावर दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगलीच भक्‍कम आहे. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या चेन्‍नई संघाला त्यांच्या चाहत्यांचा फायदा मिळेल. तसेच खेळपट्टीदेखील त्यांना हवी तशी तयार करण्याचा फायदादेखील मिळेल.

चेन्‍नईच्या प्रमुख फलंदाजांनी अद्याप म्हणावा तसा सूर गवसलेला नाही. कर्णधार धोनीचा अपवाद वगळता इतर कुठल्याच फलंदाजाला सातत्यपूर्ण चांगली फलंदाजी अद्याप करता आलेली नाही. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वॅटसन अद्याप एकही सामन्यात अर्धशतक काढू शकला नाही. तीच गोष्ट त्यांचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाबाबत म्हणता येईल. आयपीएल स्पर्धेत सर्वप्रथम 6 हजार धावांचा टप्पा गाठणार्‍या रैना मोठी खेळी अद्याप करू शकला नाही. लीन-नरीनने कोलकात्याला काही सामन्यात चांगली सलामी करून दिली आहे.

या दोघांना चांगला सूर गवसला असून आजच्या लढतीत त्यांची धडाकेबाज फलंदाजी कायम राहील, अशीच अशा संघव्यवस्थापन करत असेल. गोलंदाजीत एकापेक्षा एक सरस गोलंदाज कोलकात्याकडे आहेत. ते चेन्‍नईला किती कमी धावसंख्येत रोखतात यावरच कोलकाता संघाचे यश-अपयश अवलंबून आहे. आजच्या लढतीतील विजेता संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेईल. आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळविण्यास चेन्‍नई संघाचा नक्‍कीच आवडेल. पण सामना जिंकण्यासाठी चेन्‍नईला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More