#IPL2019 आज अंतिम सामन्याचा थरार! चौथ्या जेतेपदाला मुंबई का चेन्नई गवसणी घालणार? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 आज अंतिम सामन्याचा थरार! चौथ्या जेतेपदाला मुंबई का चेन्नई गवसणी घालणार?

हैदराबाद – गेले सव्वा महिना सुरू असलेल्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेचा 12 व्या मोसमाचा आज येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर समारोप होत असून माजी विजेते मुंबई आणि गतविजेते चेन्‍नई यांच्यातील कुठला संघ चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकणार याबाबत दोन्ही संघांच्या कोट्यवधी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उभय संघांनी प्रत्येकी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असून उद्या जेतेपदाचा चौकार कोण मारणार? याची प्रतीक्षा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे. यंदाच्या मोसमात झालेल्या उभय संघातील तीनही लढतीत मुंबईने बाजी मारली होती. त्यामुळे विजयाचा चौकार ठोकून चौथ्या जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी रोहित शर्माचा मुंबई संघ सज्ज झालेला आहे. तर गेल्या तीन सामन्यांतील पराभव धोनी आणि त्यांच्या सहकार्‍यांना जिव्हारी लागला असून त्याचा बदला घेण्यास चेन्‍नई संघदेखील जोरदार प्रयत्न करील, यात शंका नाही. चेन्‍नईने तब्बल आठव्यांदा तर मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

उभय संघात चौथ्यांदा अंतिम फेरीचा मुकाबला पुन्हा एकदा रंगणार आहे. अगोदर झालेल्या तीन अंतिम फेरीच्या लढतीत मुंबईने दोनदा तर चेन्‍नईने एकदा बाजी मारली होती. 2015 मध्ये उभय संघात अंतिम सामना झाला होता. कोलकाता येथे झालेल्या सामन्यात मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली होती. यंदा गुणतालिकेत मुंबई पहिल्या क्रमांकावर तर चेन्‍नई दुसर्‍या क्रमांकावर होती. कागदावर तरी रोहित शर्माच्या मुंबई संघाचे पारडे जड दिसत आहे. उभय संघात झालेल्या सामन्यांची आकडेवारीदेखील मुंबईच्याच बाजूने जास्त झुकली आहे. चेन्‍नईपेक्षा मुंबईने यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे.

मुंबईच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा जास्त भरणा असून त्याचा फायदा मुंबईला या स्पर्धेत मिळाला आहे. तसेच मुंबईने यंदाच्या स्पर्धेतील तीनही लढतीत चेन्‍नईविरुद्ध मिळालेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य निश्‍चितच उंचावले असेल. प्रत्येक सामन्यात मुंबईच्या एक-दोन खेळाडूंनी मोठे योगदान देऊन मुंबईला शानदार विजय मिळवून दिले. मुंबईचा सलामीवीर डिकॉकने सातत्याने चांगली फलंदाजी करून मुंबईची एक बाजू लावून धरली. त्यानेच मुंबईतर्फे आतापर्यंत सर्वाधिक धावा या स्पर्धेत केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माला मात्र विशेष सूर गवसला नाही. अवघी दोन अर्धशतके यंदा त्याला 15 सामन्यांत काढता आली आहेत. अंतिम सामन्यात मोठी खेळी करून शर्मा या स्पर्धेचा जोरदार समारोप करेल, अशी आशा त्याचे चाहते करत असतील. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या यांनीदेखील चांगली फलंदाजी करून मुंबईच्या डावाला आकार देण्याचा नियमित प्रयत्न केला.

पोलार्डने मात्र अवघ्या एकाच लढतीत अर्धशतकी खेळी केली. अंतिम सामन्यात तोदेखील आपल्या बॅटचा प्रताप दाखवेल, अशी आशा संघव्यवस्थापन करत असेल. गोलंदाजीत बुमराह, मलिंगा, पांड्या बंधू, चहर यांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. बुमराहने सर्वाधिक 17 बळी घेतले होते. तर मलिंगाने 15 बळी घेतले आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेच सातत्याने दमदार फलंदाजी करून चेन्‍नईचा किल्‍ला समर्थपणे लढविला. इतर फलंदाजांना मात्र सातत्याने मोठी धावसंख्या काढता आली नाही. सलामीवीर डुप्लिसिसने डिकॉकप्रमाणेच त्यांचा किल्‍ला लढविला. त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा स्पर्धेवर उमटवला. त्याचा सहकारी वॅटसन मात्र अपयशी ठरला. 16 सामन्यांत अवघी दोन अर्धशतके वॅटसनला काढता आली. अंबाती रायडू, सुरेश रैना यांना या स्पर्धेत अद्याप सूर गवसलेला नाही. जडेजा, ब्राव्हो यांनादेखील फलंदाजीत प्रभाव पाडता आला नाही. वेगवान गोलंदाज दीपक चहर, ब्राव्हो, हरभजन सिंग, इम्रान ताहिर यांच्यावर त्यांची गोलंदाजीची मोठी मदार राहणार आहे. ताहिरने सर्वाधिक 24 बळी आतापर्यंत घेतले आहेत.

फलंदाजांची समस्या चेन्‍नई संघाला भेडसावत आहे. सुरेश रैना, अंबाती रायडू अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करतील, अशी आशा संघव्यवस्थापन करतील. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी भक्‍कम असून बॅट-बॉलमधील हा अंतिम मुकाबला रंगतदार होण्याची अपेक्षा क्रिकेट वर्तुळात केली जाते. हैदराबादची खेळपट्टी फलंदाजांनाच अनुकूल ठरते. त्यामुळे निर्णायक सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. यजमान हैदराबादचा संघ अंतिम सामन्यात नसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची मात्र चांगलीच निराशा झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More