#IPL2019 अजिंक्य रहाणेचे शतक व्यर्थ! दिल्लीचा राजस्थानवर दमदार विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 अजिंक्य रहाणेचे शतक व्यर्थ! दिल्लीचा राजस्थानवर दमदार विजय

जयपूर – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली विरुद्धच्या लढतीत राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने काढलेल्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 191 धावांची मजल मारली. 7 वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर रहाणेने आयपीएलमधील आपले दुसरे शतक काढताना सर्वोच्च धावसंख्यादेखील नोंदवली. मात्र त्याच्या शतकी खेळीनंतरही राजस्थान रॉयल्स संघाला अपयश आले. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांच्या दमदार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने 6 गडी राखून राजस्थानवर विजय मिळवला. दिल्लीचा कर्णधार श्रेयश अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम राजस्थानला फलंदाजी दिली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला.

राजस्थान संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी अजिंक्य रहाणेने फलंदाजांच्या केलेल्या धुलाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याअगोदर त्याने 2012 मध्ये 103 धावा केल्या होत्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More