IPL 2020 : धडाकेबाज दिल्लीचा चेन्नईवर दणदणीत विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : धडाकेबाज दिल्लीचा चेन्नईवर दणदणीत विजय

शारजा – शिखर धवनचे धडाकेबाज शतक आणि अक्षर पटेलने अखेरच्या षटकांत फटकावलेल्या तीन षटकारांच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. काल शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 1 चेंडूआधी 5 विकेट गमावून पूर्ण केले. दिल्लीने 185 धावा केल्या. या सामन्यात शिखर धवनने आयपीएलमधील पहिलंवहिलं शतक झळकावलं.

सामन्याच्या सुरुवातीला चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजी करताना चेन्नईची खराब सुरुवात झाली. सॅम करन पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिसने 87 धावांची भागीदारी केली. यानंतर शेन वॉटसन 36 धावावंर बाद झाला. मग अंबाती रायुडू मैदानात आला. रायुडू आणि फॅफची चांगली जोडी जमली. यादरम्यान फॅफने अर्धशतक पूर्ण केले. मात्र 58 धावांवर तो बाद झाला. त्याने या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकार लगावले. तर धोनीने मात्र या सामन्यातही निराशा केली. तो 3 धावांवर बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शेवटच्या 21 चेंडूत या जोडीने 50 धावांची भागीदारी केली. या दरम्यान रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाने 13 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. यात त्याने 4 षटकार लगावले. चेन्नईने 4 विकेट गमावून 20 षटकांत 179 धावा केल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने नाबाद 45 धावांची खेळी केली. तसेच दिल्लीकडून एनरिच नोर्तजने सर्वाधिक 2 विकेट घेतले आणि खगिसो रबाडा व तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात झाली. दिल्लीला पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका बसला. पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. यानंतर दिल्लीला दुसरा धक्का 26 धावांवर मिळाला. अजिंक्य रहाणे 8 धावांवर बाद झाला. रहाणेनंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. अय्यर आणि धवनने तिसऱ्या विकेटसाठी 68 धावा जोडल्या. मात्र ड्वेन ब्राव्होला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने श्रेयसला 23 धावांवर बाद केले. मग ‘गब्बर’ शिखर धवन मैदानात तंबू ठोकून उभा राहिला. अय्यरनंतर मार्कस स्टोइनिस मैदानात आला. धवन आणि मार्कस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. मग मार्कस स्टोइनिस 24 धावांवर बाद झाला. यानंतर आलेला ऍलेक्स कॅरीही बाद झाला. यादरम्यान धवनने आयपीएलमधील पहिलं शतकं पूर्ण केलं. ऍलेक्सनंतर अक्षर पटेल मैदानात आला. अक्षर पटेलने धमाकेदार खेळी केली. अक्षरने षटकार फटकावत दिल्लीला विजय मिळवून दिला. शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर अक्षर पटेलने 5 चेंडूत धमाकेदार नाबाद 21 धावा केल्या. तसेच चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट घेतले आणि सॅम करन, शार्दूल ठाकूर व ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 61,871 नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 74,94,552 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर

बारामती – परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,791, पुण्यात 946 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,86,321 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. शनिवारी आढळलेल्या 10 हजार 259 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : धडाकेबाज दिल्लीचा चेन्नईवर दणदणीत विजय

शारजा – शिखर धवनचे धडाकेबाज शतक आणि अक्षर पटेलने अखेरच्या षटकांत फटकावलेल्या तीन षटकारांच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर...
Read More
post-image
News देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांचा जेडीयूत प्रवेश

लखनऊ- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील जेडीयूचे अध्यक्ष अनूप...
Read More