‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. पाकिस्तानी लष्कर सरकारी कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी शक्ती प्रदर्शन करत गुजरांवालामध्ये सरकारविरोधात सभा घेतली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधकांनी शक्ती प्रदर्शन करत गुजरांवालामध्ये सरकारविरोधात सभा घेतली. यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लष्करप्रमुख बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हामिद यांचे नाव घेऊन टीका केली.

वाचा – ‘चीनने जे केलंय ते कधीच विसरणार नाही’, कोरोनातून बरे झालेले डोनाल्ड ट्रम्प प्रचारात दंग

इम्रान खान यांच्या विरोधी पक्षातील ‘पाकिस्तान डेमोक्रेटीक मुव्हमेंट’च्या पहिल्या सभेत नवाझ शरीफ यांनी लंडनहून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवा यांचे नाव घेऊन पाकिस्तानमध्ये दोन सरकार कोणी तयार केली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर शरीफ यांनी सडकून टीका केली. तुम्ही मला देशद्रोही ठरवू शकता, माझी संपत्ती जप्त करू शकता, खोटे गुन्हे दाखल करू शकता. मात्र, नवाझ शरीफ लोकांसाठी कायम बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. खोटी प्रकरणे, गुन्ह्यासाठी आयएसआय प्रमुख फैज हामिद जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

वाचा – देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्याही खाली, नव्या ६२ हजार रुग्णांची नोंद

पाकिस्तानमध्ये सत्तेवर असलेले इम्रान खान यांचे सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका नागरिकांना बसत आहे. कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतरही एक हुकूमशहा देशातून पळून गेला. तर, दुसरीकडे एक लोकनेत्याला दोषी सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी इतर विरोधी पक्षांचीही भाषणे झाली. बिलावल भुट्टो-झरदारी यांनी इम्रान खान यांना काश्मीरच्या मुद्यावर इस्लामिक जगताला एकत्र आणणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप केला. इम्रान यांचा उल्लेख इम्रान नाझी असा करत बिलावल भुट्टो-झरदारी यांनी म्हटले की, इम्रान नाझी हे कठपुतळी असून त्यांना सत्तेवर बसवण्यात आले आहे. दरम्यान, विरोधकांच्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे सत्ताधारी पक्षाने म्हटले आहे. सरकारविरोधात ११ विरोधी पक्ष एकत्र आले असले तरी लोकांनी विरोधकांकडे पाठ फिरवली असल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. पाकिस्तानी लष्कर सरकारी कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी शक्ती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन मुंबई

कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर यांची राजकारणात एन्ट्री, पक्षाने नियुक्तीपत्रही दिले

लखनऊ – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी ठरलेले रमेश उपाध्याय यांनी राजकारण एन्ट्री केली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) या पक्षात त्यांनी प्रवेश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बसचा अपघात, २५ प्रवासी जखमी

मुंबई – मुंबई लोकल बंद असल्याने जीवनवाहिनी ठरलेली बेस्ट बसचा प्रवासही आता जोखमीचा ठरला आहे. विक्रोळीत बेस्टच्या मिनी बसचा आज अपघात झाला. विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? अजित पवार आज बारामती दौऱ्यावर,

मुंबई – गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भातपिकांपासून, भूईमूग, सोयाबीन जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक...
Read More