#INDvWI वेस्ट इंडिजसमोर ३२२ धावांचे आव्हान; विराटचे दीडशतक – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#INDvWI वेस्ट इंडिजसमोर ३२२ धावांचे आव्हान; विराटचे दीडशतक

विशाखापट्टणम – वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात भारताने ३२२ धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. विराट कोहलीच्या १५७ धावांची कामगिरी केली. तर अंबाती रायडूने अर्धशतक झळकावले. ६ विकेट देत भारताने ३२१ धावा केल्या आहेत.

सलग दुसर्‍यांदा मालिकेत विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण भारताची सुरूवात मात्र चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यातील शतकी खेळी करणारा रोहित शर्मा अवघ्या 4 धावा काढून माघारी परतला. तर त्यानंतर त्याचा सहकारी शिखर धवनदेखील 29 धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार विराट आणि अंबाती रायडूने तिसर्‍या विकेटसाठी 182 धावांची भागिदारी करून भारताचा डाव सावरला. अखेर नर्सने रायडूला 73 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्याने 80 चेंडू खेळताना 8 चौकार मारले. दुसर्‍या बाजूने कर्णधार विराटने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने आपले वन-डेतील 37 वे शतक 107 चेंडूत 10 चौकार मारून साजरे केले.त्याचे सहकारी पंत 17, धोनी 20 आणि जडेजा 13 धावा करून झटपट बाद झाले. पण विराटने मात्र कप्तानाची खेळी करून भारताचा डाव सावरण्यात मोठी भूमिका बजावली. वेस्टइंडिजतर्फे नर्स आणि मेकॉयने प्रत्येकी 2 बळी घेतले. भारताने आज या सामन्यात वेगवान गोलंदाज खलील अहमदला विश्रांती देऊन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More