#INDvsWI वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या दोन वन डेसाठी भारतीय संघ जाहीर – eNavakal
क्रीडा

#INDvsWI वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या दोन वन डेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली – आगामी वेस्ट इंडिजविरूद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विश्रांती देण्यात आलेला भारतीय कर्णधार विराट कोहली या मालिकेसाठी संघात परतला आहे.

युवा फटकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक असलेला 20 वर्षीय ॠषभ पंतचादेखील भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. दिनेश कार्तिकला मात्र वगळण्यात आले आहे. एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत धोनी फलंदाजीत अपयशी ठरल्यामुळे त्याचा विचार या मालिकेसाठी केला जाणार नाही. अशी चर्चा होती पण निवड समितीने धोनीवरील विश्वास कायम ठेवला आहे. मुंबईकर रोहित शर्मा हा संघाचा उपकर्णधार असेल. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने नुकतीच झालेली एशियाचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. 21 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे तर 24 ऑक्टोबरला विशाखापट्टणम् येथे पहिले दोन सामने होणार आहेत.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ॠषभ पंत, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दुल ठाकूर, आणि लोकेश राहुल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आश्वासनांची पुर्तता न झाल्यास बहिष्कार घालू! मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर- आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यास भाजपवर बहिष्कार घालण्यात येईल,...
Read More