#INDvsWI रोस्टन चेसच्या झुंजार खेळीने विंडीजला सावरले – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#INDvsWI रोस्टन चेसच्या झुंजार खेळीने विंडीजला सावरले

हैद्राबाद – भारत वेस्ट इंडिज संघातील आजपासून येथे सुरू झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी रोस्टन चेसने काढलेल्या नाबाद 98 धावांच्या दमदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने पहिल्या दिवस अखेर 95 षटकांत 7 बाद 295 धावांची चांगली मजल मारली. चेसने डार्विच आणि कर्णधार होल्डरसोबत अनुक्रमे अर्धशतकी आणि शतकी भागीदारी करून विंडीजला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा भारतातर्फे वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रत्येकी 3 बळी घेऊन विंडीज धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला.

वेस्ट इंडिज कर्णधार होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्याचा हा निर्णय सुरुवातीला विंडीजसाठी लाभदायी ठरला नाही. उपाहारानंतर त्यांचा अर्धासंघ 113 धावांतच माघारी परतला. पण त्यानंतर चेसने डार्विच आणि कर्णधार होल्डरला हाताशी घेऊन विंडीज डाव सावरला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेसने सहाव्या विकेटसाठी डार्विचसोबत 69 धावांची भागीदारी केली. अखेर जमलेली जोडी उमेश यादवने डार्विचला 30 धावांवर पायचीत करून फोडली. त्याने 63 चेंडू खेळताना 4 चौकार आणि 1 षटकार मारला.

डार्विची जागा घेणार्‍या होल्डरने चेसला चांगली साथ दिली. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी जमणार असे वाटत असताना खेळ संपायला थोडा वेळ बाकी असताना उमेश यादवनेच होल्डरला यष्टीरक्षक पंतमार्फत 52 धावांवर झेलबाद करून भारताला 7 वे यश मिळवून दिले. दिवसअखेर चेस 98 आणि बिशू 2 धावांवर खेळत आहेत. चेसने 174 चेंडू खेळताना 7 चौकार आणि 1 षटकार मारला.

मुंबईकर शार्दुल ठाकूरने आज आपले कसोटी पदार्पण साजरे केले. भारतातर्फे कसोटी पदार्पण करणारा तो 294 वा खेळाडू ठरला. 2 वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर शार्दुला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. याअगोदर तो 5 वनडे आणि 1 टी-20 सामना खेळला होता. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला सामन्यापूर्वी भारतीय संघाची टोपी भेट दिली. सामन्यात अवघे 10 चेंडू टाकल्यानंतर त्याच्या पायात गोळे आल्यामुळे त्याने मैदान सोडले. त्यामुळे त्याचे पदार्पण तेवढे चांगले ठरले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ) सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१२-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More