#INDvsWI भारत मालिका विजयासाठी सज्ज – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvsWI भारत मालिका विजयासाठी सज्ज

हैदराबाद – राजकोट येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्यांचा एक डाव 272 धावांनी धुव्वा उडवून भारतीय कसोटी सामन्यांच्या इतिहासात सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली होती. आता दुसर्‍या कसोटीतदेखील त्याचीच पुनरावृत्ती टीम इंडिया करेल. यात शंका नाही.
दुबळा वेस्टइंडिज संघ भारताला कितपत झुंज देतो एवढीच उत्सुकता या सामन्याबाबत आहे. एरवी कागदावर तरी फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात टीम इंडियाचेच पारडे भक्कम आहे. पहिल्या कसोटीत खेळलेला विजयी संघच बहुदा उद्याच्या सामन्यासाठी कायम राहण्याची शक्यता आहे. कदाचित मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेश यादवऐवजी शार्दुलला खेळविण्याचा विचार संघव्यवस्थापन करत आहे.

आगामी ऑस्ट्रेलिया मालिका ध्यानात घेऊन सलामीत कोण खेळणार? याचा अंतिम फैसला उद्या सामना सुरू होण्यापूर्वी केला जाईल. मुंबईकर पृथ्वी शॉने आपल्या पहिल्याच कसोटीत खेळताना दमदार शतक ठोकले होते. तर त्याचा सहकारी राहुल मात्र भोपळा न फोडताच तंबूत परतला होता. त्याला खेळविण्यात संघव्यवस्थापनाला कितपत रस आहे. याचाही निकाल सामना सुरू होण्यापूर्वी लागेल. दुसर्‍या कसोटीत पृथ्वी शॉ काय चमक दाखवितो. याकडेदेखील सगळ्यांचे लक्ष असेल. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फॉर्माबाबत संघव्यवस्थापनाला चिंता लागून राहिली आहे. कारण गेल्या 14 महिन्यात अजिंक्यला कसोटी शतकाने हुलकावणी दिली आहे. त्याला या कसोटीत मोठी धावसंख्या करावी लागेल.

विंडिज कर्णधार होल्डर अद्यापही पूर्णपणे तंदुरूस्त नाही. तसेच त्यांचा वेगवान गोलंदाज गॅब्रियलदेखील पूर्णपणे अद्याप फिट नसल्याचे समजते. त्यामुळे विंडिज गोटात काहिसे चिंतेचेच वातावरण आहे. वेगवान गोलंदाज रोशन भारतात परतला असून आता या सामन्यात खेळणार आहे. पहिल्या कसोटीत पॉवेल आणि चेजने संयमी फलंदाजी करून विंडिजचा थोडाफार डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. विंडिज फलंदाजांनी संयमाने फलंदाजी करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास ते भारतीय गोलंदाजांचा थोडाफार मुकाबला करू शकतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More