#INDvsNZ न्यूझीलंडचा भारतावर ८० धावांनी विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#INDvsNZ न्यूझीलंडचा भारतावर ८० धावांनी विजय

वेलिंग्टन – वनडे मालिकेपाठोपाठ आता आजपासून सुरू झाली आहे. असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत देखील पाहुणा भारतीय क्रिकेट संघ विजय मिळवण्यास उत्सुक आहे. मात्र आज पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ८० धावांनी विजय मिळवला आहे.

वनडे मालिकेत 4-1 असा आजवरचा सर्वात मोठा विजय भारतीय संघाने मिळवला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे फलंदाज सी मुन्रो (३४), सिफर्ट (८४)कर्णधार विल्यम्सन (३४), मिचेल (८), टेलर (23), कॉलिन दि ग्रँडहॉम (३) बाद झाले. भारतासमोर न्यूझीलंडने २१९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जिंकण्यासाठी भारताला २२० धावा कराव्या लागणार आहेत. फलंदाजीच्या सुरुवातीलाच रोहित शर्मा(१) बाद झाला तर त्याच्या पाठोपाठ धवन (२९), वी शंकर (27), पंत (४), कार्तिक (५) आणि पांड्या (४) बाद झाला.

युवा यष्टीरक्षक रिषभ पंत, कृणाल पांड्या आणि वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौरा यांचा टी-20 मालिकेसाठी खास समावेश भारतीय संघात करण्यात आला आहे. पंतच्या समावेशामुळे भारताची फलंदाजीची ताकद आणखी वाढली आहे. त्याची फटकेबाजी भारतीय संघाला एक हातीदेखील विजय मिळवून देऊ शकते. सलग 11 वी टी-20 मालिका जिंकून भारतीय संघाला पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. पाकिस्तानने सलग 10 वेळा टी-20 मालिका जिंकून नवा विक्रम केला होता. आता रोहित शर्माचा भारतीय संघ त्या विक्रमाची बरोबरी करेल, असा विश्वास तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे.

जुलै 2017 मध्ये वेस्ट इंडिजकडून भारतीय संघ टी-20 मालिकेत शेवटी पराभूत झाला होता. त्यानंतर मात्र झालेल्या 9 मालिकांमध्ये भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. कागदावर तरी भारतीय संघाचे पारडे जड आहे. विराटच्या गैरहजेरीत युवा फलंदाज शुभम गिलला पुन्हा एकदा तिसर्‍या क्रमांकावर संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच दिनेश कार्तिकला देखील आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने चांगली फलंदाजी करून भारतीय संघातील स्थान निश्चित करता येईल. कर्णधार रोहित, शिखर धवन, धोनी, कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पांड्या यांच्यावर भारताची फलंदाजीची मदार राहिल. तर भुवनेश्वर कुमार चहल, कौल, पांड्या बंधू यांच्यावर भारताची गोलंदाजीची धुरा राहणार आहे. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गुप्टिल या टी-20 मालिकेला मुकणार आहे. त्याचा मोठा फटका न्यूझीलंड संघाला बसू शकतो.

टी-20 सामन्यात रोहित शर्माला विराट कोहलीचा 12 सामने जिंकण्याचा विक्रम मोडित काढण्याची संधी मिळाली आहे. रोहितने 11 सामने आतापर्यंत जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध त्याने आतापर्यंत 2 वेळा टी-20 सामन्यात नेतृत्व केले. त्यात 1 सामना भारताने गमावला आणि 1 सामना भारताने जिंकला. कृणाल आणि हार्दिक पांड्या बंधू या सामन्यात खेळले तर आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतातर्फे खेळणारी ते तिसरे बंधू ठरतील. या अगोदर अमरनाथ बंधू आणि पठाण बंधू भारतातर्फे एकाच सामन्यात खेळले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More