#INDvsAUS भारताचा ६ गडी राखून दणदणीत विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvsAUS भारताचा ६ गडी राखून दणदणीत विजय

सिडनी – ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १६५ धावांचे आव्हान दिले आहे. बुमराह, पंड्याच्या भेदक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला १६४ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. भारताने अतिशय आकर्षक खेळी करत ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे. आता टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारत १-१ ने बरोबरीवर आहेत. कोहलीने ६१ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.


भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज दुपारी १.२० वाजता सिडनी येथे तिसरी ट्वेंटी २० लढत होणार आहे. दोन्ही देशांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. एकीकडे मालिका बरोबरीत राखण्यासाठी या लढतीत भारतीय संघाचा विजय आवश्यक असून दुसरीकडे घरच्या मैदानात मालिका खिशात घालण्यासाठी यजमान कांगारूंनी विजय मिळविणे गरजेचे आहे. एकूणच काय क्रिकेटचा थरार यावेळी तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार हे निश्चित आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज सिडनी क्रिकेट ग्राऊंंडवर तिसरी ट्वेंटी २० लढत होत आहे. यावेळी येथील खेळपट्टी संथ असल्याचे संकेत मिळाले आहेत. याचसह गेल्या काही दिवसांत येथे वादळी वारे वाहत असले तरी आजच्या लढतीत पावसाचा व्यत्यय येणार नसल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा बिनी स्टेनलेक हा खेळाडू जखमी झाला असून त्याच्या ऐवजी संघामध्ये मिचेल स्टार्क याला संधी देण्यात आली आहे. यामुळे मिचेल स्टार्क मायदेशात तब्बल ५७ महिन्यांनंतर ट्वेंटी २० सामना खेळता दिसणार आहे. याआधी तो २०१४ साली मायदेशात अखेरचा ट्वेंटी २० सामना खेळला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘अपनों के विघ्नों ने घेरा’ – संजय राऊत

मुंबई – दररोज ट्विट आणि पत्रकार परिषदेतून भाजपावर तोफ डागणारे संजय राऊत यांनी आज ‘अपनों के विघ्नों ने घेरा’ असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. आज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

संध्याकाळी ५ वाजता कॉंग्रेस-एनसीपी बैठक; सोनिया गांधी आणि पवार उपस्थित राहणार नाहीत

मुंबई – आज संध्याकाळी ५ वाजता राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि...
Read More
post-image
News मुंबई

संजय राऊत यांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट

मुंबई- कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आज दिल्लीतील बैठका रद्द करण्यात आल्याने महाराष्ट्रातील सत्तापेचाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज सलग...
Read More