#INDvsAUS भारताचा कांगारूंवर ऐतिहासिक विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#INDvsAUS भारताचा कांगारूंवर ऐतिहासिक विजय

मेलबर्न – भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळाला आहे. भारताने १३७ धावांनी विजय मिळवला असून ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत भारताने इतिहास रचला आहे. भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील १५० वा विजय ठरला.

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या दिवस अखेर विराट कोहलीची टीम इंडिया आज शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी केवळ ऑस्ट्रेलियाचे राहीलेले दोन फलंदाज बाद करायचे होते. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला आणखी 141 धावांचे लक्ष्य आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या डावात 399 धावांचे विजयी आव्हान दिले होते. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उपहाराच्या विश्रांतीनंतर सुरु झाला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने २ बळी बाद करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताकडून जाडेजा, बुमराहने सर्वाधिक ३-३ बळी टिपले.

कांगारूच्या शेपटाने दिलेल्या तडाख्यामुळे भारतीय संघाला काल चौथ्या दिवशी विजय मिळवता आला नाही. विराटने आपला दुसरा डाव 8 बाद 106 या धावसंख्येवर घोषीत केला. भारतीय फलंदाजांना दुसर्‍या दिवशी झटपट धावा वाढवता आल्या नाहीत. पहिल्या डावात पदार्पणात अर्धशतक काढणार्‍या मयांक अग्रवालला दुसर्‍या डावात अवघ्या 8 धावांनी अर्धशतकाला हुलकावणी दिली. त्यानेच भारतातर्फे सर्वाधिक 42 धावा केल्या. 102 चेंडू खेळताना मयांकने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचा कमिंन्सने त्रिफळा उडवून आज ऑस्ट्रेलियाला सकाळी पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेला जडेजा अवघ्या 5 धावा करू शकला. त्याला देखील कमिंन्सने बाद केले. यष्टीरक्षक पंत 33 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार विराटने भारताचा डाव 8 बाद 106 या धावसंख्येवर घोषित केला.

कमिंन्सने अवघ्या 27 धावात 6 बळी टिपून आपली कसोटीतील सर्वोत्‍तम कामगिरी नोंदविली. पहिल्या डावा प्रमाणेच दुसर्‍या डावात देखील ऑस्ट्रेलियाची सुरूवातीला घसरगुंडी उडाली. त्यांची 7 बाद 176 धावा अशी बिकट अवस्था झाली होती. त्यांच्या शेपटाच्या फलंदाजांनी मात्र चिवट फलंदाजी करून भारताचा विजय लांबवला. 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कमिंन्सने 61 धावांची झुंझार नाबाद खेळी केली. त्याने 103 चेंडू खेळताना 5 चौकार आणि 1षटकार मारला. त्याने कर्णधार पेन सोबत 7 व्या विकेटसाठी 19 धावांची आणि नंतर स्टार्क सोबत 8 व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा किल्‍ला लढवला. दिवस अखेर कमिंन्स 61 आणि लिवॉन 6 धावांवर खेळत आहेत. भारतातर्फे फिरकी गोलंदाज जडेजाने 3 बळी घेतले, तर बुमराह आणि शमीला प्रत्येकी 2 बळी मिळाले. इशांत शर्माला 1 बळी मिळाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More