#INDvsAUS दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद १३२ धावा – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvsAUS दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद १३२ धावा

पर्थ – पर्थ येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या डावात १३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 या धावसंख्येला उत्तर देताना आज तिसऱ्या दिवशी भारताने २८३ धावांचा पल्ला गाठला. त्यांच्याकडे आता एकूण 175 धावांची आघाडी असून त्यांचे 6 फलंदाज बाद होणे बाकी आहेत. आज सकाळी भारताचा पहिला डाव 283 धावात संपला. उपकर्णधार रहाणे आज लगेचच सुरुवातीला बाद झााला त्याला लियॉनने 51 धावांवर बाद केले. रहाणे बाद झाल्यानंतर विहारी 20 आणि पंत 36 धावा याने विराटला बर्‍यापैक साथ दिली. विराटने 257 चेंडू खेळताना 13 चौकार 1 षटकार मारून 123 धावांची शानदार खेळी केली. त्याचे यंदाच्या वर्षातील पाचवे कसोटी शतक होते. ऑस्ट्रेलियाविरुध्दचे त्याचे 7 वे शतक होते.

तर विराटने आपले ऑस्ट्रेलियातील 6 कसोटी शतक साजरे केले. त्याला कमिंन्सने बाद करून विराट खेळी संपवली. विराट बाद झाल्यानंतर भारताचा डाव फार लांबला नाही. लिवॉननं बुमराहला 4 धावांवर बाद करून भरताचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियातर्फे लिवॉनने सर्वाधिक 5 बळी घेतले आपल्या कारकिर्दीत कसोटीत लिवॉनने 14 व्यांदा 5 कींवा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला. भारताविरूध्द सातव्यांदा एकाच डावात पाच बळी घेऊन त्याने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबरी केली. तर र्स्टाक, हेजलवुडला प्रत्येकी 2 बळी मिळाले. तर कर्णधार विराटचा महत्त्वाचा बळी कमिन्सने घेतला. भारताचा पहिला डाव उपहारानंतर अवघ्या 12.3 षटकात संपला. अवघ्या आणखी 60 धावा काढून भारताचे राहिलेले सहा फलंदाज माघारी परतले. यष्टीरक्षक पंतने पुन्हा एकदा कारण नसताना हाराकीरी करून आपला बळी नाहक गमावला. विराटने काढलेल्या शतकाचा भारताचा तळाच्या फलंदाजांना फायदा घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात 4 बाद 132 धावांची मजल मारली आहे. उस्मान ख्वाज्वा 41 आणि कर्णधार पेन 8 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने सलामीवीर हॅरीस 20,मार्श 5, हॅडसकॉब 13 आणि हेड 19 धावा यांचे बळी गमावले. उस्मानने चिवट फलंदाजी करून त्यांची एक बाजू लावून धरली 102 चेंडूचा मूकाबला करताना त्याने पाच चौंकार मारले. सलामीवीर फिंचच्या बोटावर शमीचा चैंडू लागल्यामूळे 25 धवांवर तो निवृत्त झाला. शमीचे सामन्यातील हे तेरावे षटक होते तर तेव्हा ऑस्ट्रेलियाची बिन बाद 33 धावसंख्या होती. फिंचच्या बोटाचा एक्सरे घेतल्यानंतर त्याची दुखापत कितपत गंभीर आहे हे कळू शकेल. ऑस्ट्रेलियाच्या दूसर्‍या डावात शमीने सर्वाधीक दोन बळी घेतले. तर ईशांत शर्मा, बुमराहने प्रत्येकी 1 बळी घेतला.उद्या चौंथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा दूसरा डाव झटपट गुंडाळणेे आवश्यक आहे. नाही तर भारतचा विजय कठीण होऊ शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More