#INDvENG शेवटच्या सत्रात टीम इंडियाचे जोरदार ‘कमबॅक’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#INDvENG शेवटच्या सत्रात टीम इंडियाचे जोरदार ‘कमबॅक’

एजबस्टन, लंडन – कालपासून सुरू झालेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या सत्रात इंग्लंडचे 6 बळी घेऊन या सामन्यात जोरदार ‘कमबॅक’ केले. चहापानानंतर 4 बाद 216 धावा अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंड संघाची नंतर मात्र घसरगुंडी उडाली. 69 धावांत त्यांचे 5 फलंदाज तंबुत परतले. पहिल्या दिवस अखेर इंग्लंडने 88 षटकांत 9 बाद 285 धावांची मजल मारली.

भारताचा बुजुर्ग फिरकी गोलंदाज अश्विनने 4 बळी घेऊन इंग्लंड धावसंख्येला व्यसण घातले. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2 आणि उमेश यादव, ईशांत शर्माने प्रत्येकी 1 बळी घेऊन अश्विनला चांगली साथ दिली. इंग्लंड संघाचा हा 1 हजारावा ऐतिहासिक कसोटी सामना होता. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात मात्र खराब झाली. सलामीवीर कुक 13 धावांवर अश्विनचा बळी ठरला. त्यानंतर जेनिंग 42, रुट 80 आणि बेअरस्टो 70 धावा यांच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडला 250 धावांचा टप्पा गाठता आला. कर्णधार रुटने आपल्या कारकीर्दितील 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडतर्फे 6 हजार धावा सर्वात वेगात पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात रुटने शतके काढली होती. येथे मात्र त्याचे शतक 20 धावांनी हुकले.

विराटच्या थेट फेकीने रुट धावचित झाला. तब्बल 11 व्यांदा रुटला अर्धशतकाचे रुपांतर शतकामध्ये करता आले नाही. त्याने बेअरस्टोसोबत 4 थ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला. दिवसअखेर अ‍ॅन्डरसन 0 आणि कुरेन 24 धावांवर खेळत आहेत. भारताने या सामन्यात पुजाराला विश्रांती देऊन राहुलला संधी दिली. तसेच युवा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी न देता 4 वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१८-०२-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०६-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More