#INDvAUS पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvAUS पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव

ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारताचा चक्क चार धावांनी पराभव झाला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे डीएलएस पध्दतीनुसार  भारतासमोर 174 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.


पण हे आव्हान पार करत असताना भारताच्या भरोसेमंद फलंदाजांनी भारतीय क्रिेकट प्रेमींचा अपेक्षाभंग केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला रोहित शर्मा अवघ्या  7 धावांवर बाद झाला. जासोन बेह्र्रेंडॉर्फ या ऑस्ट्रेलियाच्या तेज गोलंदाजीसमोर रोहित टीकू शकला नाही. अॅरोन फिंच याने झेलबाद करत रोहितला तंबूत पाठवले.


त्यानंतर लोकेश राहूल, (13 धावा), विराट कोहली (04 धावा), ऋषभ पंत ( 20 धावा), दिनेश कार्तिक (30 धावा) यांच्याकडून आजच्या सामन्यात अपेक्षेप्रमाने खेळी झाली नाही तर भारताचा एकमेव खेळाडू शिखर धवन 42 चेंडूत 79 धावा काढून भारताचा या सामन्यात आधारस्तंभ बनला.


विराट कोहलीची ब्रिगेड आजपासून ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. त्याचीच सुरूवात आजच्या पहिल्या २०-२० लढतीपासून ब्रिस्बेनमध्ये झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण त्याचा तितका फयदा भारताकडून झालेला दिसला नाही. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 174 धावांचे आव्हान ठेवले होते.

डेविड वॉर्नर व स्टीवन स्मिथच्या अनुपस्थितीत अॅरोन फिंचच्या युवा ऑस्ट्रेलियाचाही यावेळी कस लागेल हे निश्चित. यावर्षी त्यांना भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्यासोबत म्हणावे तसे यश संपादित करता आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोर भारतीय क्रिकेट प्रेमींच्या आपेक्षांसह खेळाचे माठे आव्हान पार करावे लागणार आहे, हे निश्चित.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More