भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय

हैदराबाद- मराठमोळा केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय मिळविला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान भारतीय संघाला विजयासाठी 237 धावा हव्या आहेत. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने प्रथम फलंदाजी घेतली पण त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला घेता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 236 धावांची मजल मारली.
सलामीवीर खाज्वा 50, मॅक्सवेल 40 या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या काढता आली नाही. त्यांची सुरुवातदेखील खराब झाली. कर्णधार फिंचला बुमराहने भोपळादेखील फोडू दिला नाही. त्यानंतर खाज्वा आणि स्टोनीसने दुसर्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करून त्यांचा डाव सावरला. पण स्टोनीसला केदार जाधवने 37 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. नंतर उस्मानलादेखील कुलदीप यादवने 50 धावांवर बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. उस्मानने 76 चेंडू खेळताना 5 चौकार आणि 1 षटकार मारला. उस्मान बाद झाल्यानंतर सातत्याने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले. टी-20 सामन्यात छान फलंदाजी करणार्या मॅक्सवेलने पुन्हा एकदा 51 चेंडूंत 5 चौकार मारून 40 धावांची चांगली खेळी केली. त्याला टर्नर 21, कॅरी 36, नाथन 28 धावा यांनी चांगली साथ दिली.
शमीने जम बसलेल्या मॅक्सवेल आणि टर्नरचे बळी घेतले. तर बुमराहने फटकेबाजी करणार्या नाथनला बाद केले. धोकादायक स्टोनीसला केदार जाधवने बाद करून भारताला महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिला. भारतीय संघात जडेजाचे पुन्हा कमबॅक झाले. भारतातर्फे शमी, बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 बळी घेतले.
237 धावांचा पाठलाग करत असताना भारताच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली होती. सलामीवीर शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी-केदार जाधव यांच्यात झालेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने सामन्यात विजय संपादन केला. केदार जाधवने नाबाद 81 तर धोनीने नाबाद 59 धावांची खेळी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More