#HumFitTohIndiaFit मुख्यमंत्री कुमारस्वामींनी पंतप्रधानांचे फिटनेस चॅलेंज झिडकारले – eNavakal
आरोग्य राजकीय

#HumFitTohIndiaFit मुख्यमंत्री कुमारस्वामींनी पंतप्रधानांचे फिटनेस चॅलेंज झिडकारले

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले फिटनेस चॅलेंज झिडकारून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मोदींना तोडीस तोड उत्तर दिले आहे. कुमारस्वामी यांनी ट्वीटमधून म्हटले आहे, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही माझ्या तब्बेतीची काळजी दाखवलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी रोज योगा-ट्रेडमिल करतो आणि तो माझ्या व्यायामाचा भाग आहे. पण मी माझ्या राज्याच्या विकास, फिटनेसबद्दल जास्त चिंतित आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे’.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचे फिटनेस चॅलेंज अनेक नामवंत व्यक्तींनी स्विकारले आहे. अनेकांनी व्यायाम करतानाचा स्वत: चे व्हिडीओदेखील सोशल मिडियावर अपलोड केले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरत कोहली याने हे चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले होते. मोदींनी हे  चॅलेंज स्विकारून लवकरच मी स्वत: व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करेन असे सांगितले होते. आज त्यांनी स्वत: चा व्यायाम करतानाचा व्हिडीओ अपलोड केला आणि हेच चॅलेंज कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना दिले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आज लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल जाहीर झाले. भाजपाने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान...
Read More