पावसाळ्यात श्वसनाच्या विकारापासून कसे दूर राहाल? – eNavakal
आरोग्य ट्रेंडिंग

पावसाळ्यात श्वसनाच्या विकारापासून कसे दूर राहाल?

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या उष्णतेला कंटाळलेले सारेच आता पावसाच्या आगमनाने सुखावले आहे. मात्र हे बदलते वातावरण आरोग्यासाठी तितकेच हानीकारक असून श्वसन विकार, छातीत जळजळ अशा विकारांना आमंत्रण देते. म्हणून या दिवसात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे सतत पावसात भिजणे, ओले कपडे अंगावर अधिक काळ राहणे, केस ओले न ठेवणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये योग्य खबरदारी न घेतल्यास कोणत्या श्वसन विकारांना सामोरे जावे लागते याबद्दल फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ अरविंद काटे सविस्तर माहिती दिली आहे.

दमा हे अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शन (विविध प्रकारचे सामान्य सर्दी, टॉन्सिलिटिस आणि सायनस इन्फेक्शन) आहे. याची सामान्य लक्षणे खोकला, वाहणारे नाक, घसा खवखवणे आणि शिंका येणे, छातीत घरघर आणि फुफ्फुसातील फायब्रोसिस देखील आमंत्रित करतात.

त्याचप्रमाणे, कमी लोअर रेस्पीरेटरी ट्रक्ट इन्फेक्शन्स (फुफ्फुसात किंवा श्वासोच्छवासाच्या श्वसनमार्गामध्ये उद्भवते). यामध्ये न्यूमोनिया (दोन्ही फुफ्फुसाचा संसर्ग), ब्राँकायटिस , क्षयरोग किंवा टीबी यांचा समावेश आहे. यामुळे खोकला, श्वास घेण्यात अडचणी येणे आणि छातीत रक्तसंचय होते. म्हणूनच श्वासोच्छवासाच्या या सामान्य समस्यांपासून स्वत: ला दूर ठेवण्यासाठी पावसापासून दूर राहणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनमार्गातील अडचणींपासून असे दूर रहा

  • फप्फुसाला निरोगी ठेवण्यात मदत करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश असू द्या. जसे की ओमेगा ३ फॅटी एसिडयुक्त पदार्थांचे सेवन करा अक्रोड, ब्रोकोली, सफरचंद तसेच एन्टीऑक्सीडंट्सचाही आहारात समावेश करा. बेरी, पपई, अननस, कोवी, गाजर, हळद, आलं यांचा जेवणात समावेश करा.
  • भरपूर पाणी प्या.
  • दररोज व्यायाम करा. स्वस्थ राहण्यासाठी योगाभ्यास तसेच मेडिशनसारख्या पर्यांचा वापर करा.
  • दररोज गरम पाण्याची वाफ घ्या. फुफ्फसामध्ये जमा होणारा कफ काढून टाकण्यास याची नक्कीच मदत होईल. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
  • धुम्रपान करणे टाळा. तसेच पॅसिव्ह स्मोकींगही तितकेच धोक्याचे असून त्यापासून दूर रहा.
  • खोकताना व शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा.
  • जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर लागणारी औषधांचा घरात पुरेसा साठा करून ठेवा.
  • नियमित फप्फुसांचा व्यायाम करा. त्याने फुफ्फसात साचलेला कफ दूर ठेवण्यास मदत होईल.
  • पावसात बाहेर पडणे टाळा. धुर, धुळ आणि प्रदुषकांपासून दूर रहा.
  • रस्त्यावर इतरत्र थुंकु नका. आणि जर कोणी तसे करताना दिसले तर त्यांना तिथेच थांबवा.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील पहिल्या टेलिआयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता...
Read More
post-image
देश मनोरंजन

गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली

मुंबई – सुप्रसिद्ध गायक एस.पी.सुब्रमण्यम यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आता अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं असून, डॉक्टर्स त्यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 12 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई, दि.१४ : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील 58 पोलिसांचा गौरव, केंद्राकडून पोलिस पदके जाहीर

नवी दिल्ली – 74व्या भारतीय स्वातंत्र्यादिनानिमतित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्यांची नावे जाहीर केली. पोलिसांच्या...
Read More
post-image
Uncategoriz

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची मदत

मुंबई – कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास...
Read More