पंजाब होणार कोरोनाचे HotSpot? ४० हजार NRI पंजाबमध्ये परतले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

पंजाब होणार कोरोनाचे HotSpot? ४० हजार NRI पंजाबमध्ये परतले

जालंधर – देशभरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मात्र पंजाब हे राज्य केव्हाही कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दोन महिन्यांत पंजाबमध्ये ४० हजाराहून अधिक अनिवासी भारतीय (NRI-Non Resident Indians) पंजाबमध्ये परतले आहेत. शिवाय या NRI कडून Home quaratine चेही पालन होताना दिसत नाहीत. शिवाय आपल्याकडे परदेशी लोक आलेत याचीही माहिती लपवली जाते आहे. लोकांच्या या बेफिकरीमुळे पंजाबमध्ये आणि परिणामी संपूर्ण देशाची कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला NRIची एक लिस्ट पाठ‌ण्यात आलीय. त्यात गेल्या काही महिन्यात ४० हजाराहून अधिक NRI पंजाबमध्ये परतलेे आहेत. त्यात २३ हजार NRI डोबा येथे पसरतले आहे. जालंधर, होशिरपूर, कपुरथाला आणि नवाशहर हे जिल्हे या विभागात मोडतात. गेल्या आठवड्यात १० हजार NRI आले आहेत. जालंधर जिल्ह्याला मिळालेल्या लिस्टनुसार १२९०६ NRI गेल्या दोन आठवड्यात आले आहेत. तर, गेल्या शनिवारी हजारहून अधिक NRI पंजाबमध्ये परतले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इटलीतून हजारहून अधिक NRI कोथारपालाच्या बोलथ या गावी परतले आहेत. जगभरात इटलीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या NRI यांनी कायद्याचं पालन नाही केलं तर भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक NRI पंजाबमध्ये परतल्याची माहिती मिळताच पंजाब राज्यातील आरोग्य आणि पोलीस विभागाने अशा कुटुंबातील NRI ची तपासणी केली असून त्यांना पुढील १४ दिवसाचे होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र काही NRI या आदेशाला धुडकावून खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत.
काही कुटुंबीय आपल्याकडे NRI आल्याची माहिती लपवून ठेवत आहेत. त्यामुळे आरोग्य आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. NRI ना शोधण्यातच पोलीस विभागाची ऊर्जा खर्ची होत आहे. पंजाबमध्ये परतलेल्या एक टक्के NRIही पोलीसांना सहाय्य करत नसल्याची खंत तेथील पोलिसांनी व्यक्त केली.
फेब्रुवारी महिन्यात युरोप देशांमध्ये कोरोनाने कहर केला. त्यामुळे तेथील अनेक भारतीयांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत भारतात हा कोरोना पसरला नव्हता त्यामुळे केंद्र सरकारने हवाई वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले नव्हते.
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पंजाबमध्ये अनेक NRI परतत असतात. मात्र यंदा मार्चपर्यंत NRI परतत आहेत. कॅनाडामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रचंड थंडी असते. त्यामुळे या वॅकेशन्समध्ये लोक भारतात येतात. आकडेवारीनुसार पंजाबमधील जवळपास ५५ लाख लोक परदेशी स्थायिक झाले आहेत.

LockDown मध्येही मध्य रेल्वेची चोख सेवा, वाचा मालवाहतूक कशी होतेय?

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More