भयंकर! कोरोनामुळे झालेले चीनचे हे हाल पाहून तुम्हीही कराल हळहळ व्यक्त – eNavakal
आरोग्य ट्रेंडिंग विदेश

भयंकर! कोरोनामुळे झालेले चीनचे हे हाल पाहून तुम्हीही कराल हळहळ व्यक्त

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशत पसरली आहे. आतापर्यंत १७०० लोकांचे प्राण गेले असून ७० हजारहून अधिक लोकांना या विषाणुची लागण झाली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून मृतांचीही संख्या वाढत आहे. हा विषाणू आपल्या शरीरात केव्हाही शिरकाव करून आपल्याला उद्ध्वस्त करेल अशी भिती जगभरातील नागरिकांना सतावत आहे. सतत गजबजलेलं असलेला चीन, उद्योग व्यवसायास, शिक्षणासाठी टॉप लिस्टवर असलेले चीन गेल्या काही दिवसांपासून ओसाड पडत आहे. आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद झाल्याने आणि अंतर्गत वाहतुकीला ब्रेक लागल्याने चीनमधील अनेक शहरांत शांतता पसरली आहे.

डॉक्टर आणि नर्सेसचे प्रयत्न


कोरोना विषाणूवर अद्यापही ठोस औषध सापडले नसले तरीही हा विषाणू अधिक पसरू नये याकरता डॉक्टर दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. चीनने अवघ्या १० दिवसांत रुग्णालय स्थापन करून कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी अनेक डॉक्टर आणि नर्स तहान भूक हरवून रुग्णांची जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गजबजलेलं शहर पडलं ओसाड


चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला. वुहानमध्ये ११ मिलिअनपेक्षा अधिक लोक राहतात. चीनमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये गणलं जाणाऱ्या वुहान शहरातील रस्ते ओसाड पडले आहेत. येथील पुलांवरून सतत वाहनांची येजा सुरू असायची. कर्णर्ककश हॉर्नच्या आवाजांनी शहरात सतत गोंगाट असायचा. मात्र कोरोनाच्या भितीने हे शहर निर्मनुष्य झालं आहे.

हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची संख्या वाढली

ताप,सर्दी, खोकला आल्यावरही येथील लोक आता घाबरत आहेत. कोरोनाची लक्षणं आढळल्यास तत्काल रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णालयातील गर्दी वाढत आहे. सारीच रुग्णालये ओसंडून वाहत असून रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यासही आता बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे मिळेल त्या जागेवर रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खुर्च्या, रिकाम्या जागा जिथे मिळेल तिथे रुग्ण पहुडलेले दिसतात.एवढंच नाही तर मृतदेह ठेवायलाही जागा नसल्याने मिळेल त्या जागी मृतदेह ठेवले जात आहेत.

वुहानच्या प्रदर्शन केंद्रात १००० खाटा

रुग्णांवर उपचार करता यावेत याकरता वुहानच्या प्रदर्शन केंद्रात (एक्झिबिशन सेंटर) १००० खाटांची सोय करण्यात आली आहे. चीनमधील प्रत्येक संशयित रुग्णावर उपचार करता यावेत, एकही रुग्ण उपचारासाठी वंचित राहू नये याकरता चीनकडू प्रयत्न केले जात असून एक्झिबिशन सेंटरमध्येही रुग्णांच्या उपचारांसाठी सोय करण्यता आली आहे.

खुर्ची आणि फरशीवर झोपतात डॉक्टर

रुग्णांवर उपचार करता यावेत याकरता डॉक्टर आणि नर्स चोवीस तास प्रयत्न करत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही. तसेच, झोप अथवा थकवा आल्यास ते खुर्चीवरच डोकं ठेवून झोपी जातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळे सुजणे, लाल होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांरस्त्यावर मृतदेह


चीनच्या रस्त्यांरस्त्यांवर मृतदेह सापडत आहेत. हृदयाला पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जागोजागी पहुडलेले मृतदेह पाहून हा विषाणू लवकरात लवकर जगातून नष्ट व्हावा अशीच अपेक्षा साऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

डोक्यावर प्लास्टिक बॉटल्स


चीनमध्ये सारेचजण चेहऱ्यावर मास्क लावून फिरत आहेत. मात्र काहीठिकाणी लोकांनी मोठ्या प्लास्टिक बॉटल्स चेहऱ्यावर ठेवल्या आहेत. प्रवासात मास्कचा उपयोग होत नसल्याने लोकांना प्लास्टिक कंटेनर सोयीचे वाटत आहे.

चीनचे जवानही आले मदतीला


देशाचं संरक्षण करण्यासाठी सतत तैनात असलेले जवान आता रुग्णांच्या सेवेसाठीही दाखल झाले आहेत. अनेक रुग्णालयात चीनचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

नवजात बाळालाही कोरोनाने घेरलं


कोरोना व्हायरस झपाट्याने सगळीकडे पसरत आहे. नवजात बाळालाही कोरोनाने घेरलं आहे. त्यामुळे या बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More