कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या – eNavakal
महाराष्ट्र

कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या

पुणे – एकीकडे पुण्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच रुग्णांमध्ये नैराश्येचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका इसमाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहकारनगरमध्ये संदीप भोसले हे आपल्या कुटुंबासोबत अनेक वर्षापासून राहण्यास होते. संदीप यांच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली होती. या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांत संदीप यांना देखील कोरोना झाल्याचा अहवाल आला.

दरम्यान, भोसले यांच्या कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते. संदीप यांनी कोरोनावरील उपचार घेतले आणि डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीमधील घरी राहत होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना सासरी सोडले होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ काल सकाळच्या सुमारास नाष्टा घेऊन पद्मावती येथील घरी आल्यावर, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

संदीप भोसले यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या

पुणे – एकीकडे पुण्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच रुग्णांमध्ये नैराश्येचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका इसमाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दर्शनासाठी निघालेली बोट ४५ प्रवाशांसह उलटली, तिघांचे मृतदेह सापडले

कोटा – ४५ प्रवाशांना घेऊन कमलेश्वर धाम दर्शनासाठी निघालेली बोट राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत उलटली आहे. या बोटीत पुरुषांसह महिला आणि लहान मुलंही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपुरात हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नागपूर – नागपूरमध्ये कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी महानगरपालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागपुरात आधी हजार खाटांचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत जितेंद्र आव्हाडांना पुन्हा भेटला जुना राजकीय मित्र

ठाणे – ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीमुळे दोन जुने राजकारण मित्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.  शिवसेनेचे आमदार प्रताम सरनाईक आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, मेटेंची मागणी

बीड – मराठा आरक्षणप्रकरणी सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक...
Read More