#HockeyWorldCup2018 भारत भिडणार इटलीला – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#HockeyWorldCup2018 भारत भिडणार इटलीला

लंडन – राणीने ३१व्या मिनिटाला गोल करीत भारतीय महिला हॉकी संघाला अमेरिकेविरुद्धच्या लढतीत १-१ अशी बरोबरी साधून दिली आणि महिला हॉकी वर्ल्ड कपमधील आपले आव्हान कायम ठेवले. आता ३१ जुलै रोजी होणार्‍या प्ले ऑफच्या लढतीत भारतीय संघासमोर इटलीचे आव्हान असणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास भारताच्या महिला संघाला दोन ऑगस्ट रोजी आयर्लंडचा सामना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत करावा लागणार आहे.

साखळी फेरीत तिसरा क्रमांक

भारतीय महिला संघाला साखळी फेरीत आपला ठसा उमटवता आला नाही. ब गटात समावेश असलेल्या भारतीय संघाला अवघ्या दोन गुणांसह तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटात आयर्लंडने सहा गुणांसह पहिले तर यजमान इंग्लंडने पाच गुणांसह दुसरे स्थान पटकावले. सलामीच्या लढतीत इंग्लंडला बरोबरीत रोखल्यानंतर अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत अमेरिकेला १-१ अशा बरोबरीत रोखल्यामुळे भारताचा  प्ले ऑफमधील प्रवेश सुकर झाला.

सर्वोत्तम कामगिरी चौथे स्थान

भारतीय महिला हॉकी संघाला वर्ल्ड कपच्या जेतेपदावर अद्याप एकदाही मोहोर उमटवता आलेली नाही. १९७४ साली प्रâान्समध्ये महिलांचा पहिलावहिला हॉकी वर्ल्ड कप पार पडला. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. ही या संघाची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. त्यानंतर भारताच्या महिला संघाला अशाप्रकारची कामगिरी करता आलेली नाही. ही खेदजनक बाब.

राह मुश्किल…

भारतीय महिला हॉकी संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला असला तरी पुढील प्रवास हा खडतरच आहे. आता त्यांचा मुकाबला इटलीशी होणार आहे. इटलीने अ गटातून सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. यामध्ये दोन विजयांचाही समावेश होता. भारतीय संघाने इटलीला हरवल्यानंतरही उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा त्यांच्यासमोर असणार आहे. या लढतीत त्यांना आयर्लंडचा सामना करावा लागणार आहे. साखळी फेरीत भारतीय महिला संघाला आयर्लंडकडून हार सहन करावी लागली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More