सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई आणि पाटणा पोलिसांमध्ये हाय होल्टेज ड्रामा ! – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई आणि पाटणा पोलिसांमध्ये हाय होल्टेज ड्रामा !

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बिहारमध्ये राजकारण तापलेले असतानाच आता मुंबई आणि बिहार पोलीस आमने सामने आले आहेत. काल रात्री मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये रस्त्यावर हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईमध्ये बिहार पोलीस अधिकारी अंधेरीतील पोलीस उपायुक्तांना भेटायला गेले होते. यानंतर बिहार पोलिसांना मीडियाशी बोलायचं होते. पण मुंबई पोलिसांनी बिहार पोलिस अधिकाऱ्यांना कडेकोट बंदोबस्तात अक्षरशः ढकलत ढकलत पोलीस व्हॅन मध्ये नेऊन बसविले. बिहारी पोलीस अधिकाऱ्यांना प्रसिद्धिमाध्यमांशी बोलू दिले नाही. विशेष म्हणजे पोलिस व्हॅनमध्ये बसलेले बिहारी अधिकारी प्रसिद्धीमाध्यमांना अक्षरशः गाडीतूनच हात जोडत होते. आता हीच मुंबई पोलिसांच्या ढकलाढकलीची व्हिडिओ क्लिप सर्वोच्च न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे.

एकीकडे बिहारचे मंत्री मुंबई पोलिसांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवित असताना मुंबई पोलीस या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नाहीत, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. त्यातच बिहार पोलीस मुंबईमध्ये डीसीपी असलेल्या अकबर पठाण यांना प्रमुख अधिकारी म्हणून भेटायला आले होते. मुंबई पोलिसांबरोबर बिहार पोलिसांची चर्चाही झाली. या चर्चेमध्ये काही गोष्टींची शहानिशा करण्यात आली. ही चर्चा झाल्यावर बिहारचे पोलीस अधिकारी बाहेर पडत असताना समोर प्रसार माध्यमांचे अनेक पत्रकार बिहार पोलिसांना बोलण्यासाठी विनंती करत होते. मात्र मुंबई पोलीस या बिहार पोलीस अधिकाऱ्यांना कडेकोट बंदोबस्तात ढकलत ढकलत जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये नेऊन बसवत होते हे दृश्य अनेक टीव्ही चॅनल्सनी संपूर्ण देशभर प्रक्षेपित केले आहे. त्यामुळे आता याच ढकलाढकलीची व्हिडीओ क्लिप सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र मुंबई राजकीय

भाजपच्या आरोपांमुळेच वाद सुरू झालाय, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात मनसेचा ठाकरेंना पाठिंबा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते...
Read More
post-image
मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरस्वती महाविद्यालयात डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा होणार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा-महाविद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या महाविद्यालयाने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘सुशांतसाठी टाहो फोडला, पण चुलत भावाच्या हत्येनंतर ब्रही काढला नाही,’ विनायक राऊतांचा राणेंना टोला

सिंधुदुर्ग – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी भाजपकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषदेत...
Read More
post-image
Uncategoriz महाराष्ट्र

बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकारचे पुढचे पाऊल, सर्वोच्च न्यायालयात विनंती करणार

मुंबई – बैलगाडा शर्यतीबाबत महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला असूनही सद्यस्थितीत बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. फेब्रुवारी 2018 पासून या विषयांमध्ये सर्वोच्च न्यायालय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास अडचण, उपचारांसाठी नागपुरवरून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात

नागपूर – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आता नवनीत राणा यांना श्वास...
Read More