कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीचे 3 दरवाजे पुन्हा उघडले – eNavakal
महाराष्ट्र

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीचे 3 दरवाजे पुन्हा उघडले

कोल्हापूर- गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात सहा फूट वाढ झाली होती. तर आज सकाळी राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती होणार की काय अशी भीती कोल्हापूरवासियांत निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला होता. यामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली होती. अनेक नद्यांना पूर आला होता. नागरिकांचे स्थलांतर केले जात होते. एनडीआरएफचे पथकही कार्यरत होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र कालपासून पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे.

आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळला. पावसाचा वेग वाढल्याने राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडण्यात आले होते. पंचगंगा नदीची काल सकाळी दहा वाजता पाणी पातळी 27 फूट इतकी होती. आज सकाळी दहा वाजता ती 33 फुटांवर गेली होती. तर काल पावसामुळे 46 बंधारे पाण्याखाली गेले होते. आज ही संख्या 58 वर गेली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू

नागपूर –  काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली. ऊसरे हे काँग्रेसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा! पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर पीएमपीएल...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीचे 3 दरवाजे पुन्हा उघडले

कोल्हापूर- गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागडसह अनेक गावे संपर्काबाहेर

गडचिरोली – मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसरासह शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे भामरागडच्या...
Read More
post-image
देश राजकीय

सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज टि्वट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे...
Read More