कोकणात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोकणात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबई- सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच आता हवामान खात्याने येत्या 20 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींसह पाऊस कोसळत आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोकणातील वाशिष्ठी, अर्चना, गोदावरी या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी तेथील बाजारपेठेत शिरल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पावसाचा हा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार कोकणात येत्या 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोकणात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबई- सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच आता हवामान खात्याने...
Read More
post-image
महाराष्ट्र

चंद्रपुरातील तीन शहरात पाच दिवस लॉकडाउन

चंद्रपूर – राज्यातील सर्वात आधी ग्रीन झोन बनलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा बस्तान ठोकले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे हॉट स्पॉट बनलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डॉक्टरांविषयी आदर आहे, त्यांच्यासाठी मदतीला धावून गेलोय- संजय राऊत

मुंबई – जागतिक आरोग्य संघटनेला काय कळंतय? डॉक्टरांपेक्षा कंपाऊंड हुशार असतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. त्यांच्यावर...
Read More
post-image
विदेश

कोरोनामुक्त झालेल्या न्युझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, निवडणुका लांबणीवर

ऑकलंड – कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. मागील २४ तासात न्यूझीलंडमध्ये १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दिलासादायक! मुंबईतील २० वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी

मुंबई – कोरोनाच्या साथीने गेले पाच महिने मुंबईत तळ ठोकला आहे. पण हळूहळू कोरोनाने मुंबईतील काही विभागांमधून काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे....
Read More