मुंबई – दोन आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. परंतु येत्या ४ ते ५ दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल आणि मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात आज हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या ३-४ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यातही मुंबई, ठाणे या शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त राहिल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी २२ ऑगस्टलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे.