#HappyBirthday सदाबहार अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ – eNavakal
मनोरंजन लेख

#HappyBirthday सदाबहार अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’

आज मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० नाशिक येथे झाला. ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.

तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अविनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अविनाश नारकर यांचा आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं.

अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे. या सुखांनो या ही त्यांची गाजलेली मराठी मालिका आहे. याशिवाय ‘बेटियाँ’ या हिंदी मालिकेतही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. ‘सून लाडकी या घरची’ या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘चॅम्पिअन्स’ या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचे विशेष कौतुक झाले. ऐश्वर्या नारकर हा जाहिरातींमधीलही प्रसिद्ध चेहरा आहे. ऐश्वर्या नारकर यांनी ‘माझे मन तुझे झाले’ या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत. ऐश्वर्या नारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More