गुज्जर आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल – eNavakal
आंदोलन देश वाहतूक

गुज्जर आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

मुंबई – गुज्जर आंदोलनाला आज आठवडा पूर्ण झाला परंतु आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी रेल्वे ट्रॅकवरच आपले बस्तान मांडले आहे.  त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली असून रेल्वेला मार्ग बदल करावा लागला आहे. आज सुटणारी वांद्रे टर्मिनल अमृसर एक्स्प्रेस नागदरा-कोटा-सवाई माधोपूर या मार्गाऐवजी चंदेरिया-जयपूर-रेवाडी या मार्गावरून जाणार आहे. वांद्रे टर्मिनस ते कानपूर सेंट्रल् एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस ते निजामुद्दीन युवा एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 18 तारखेला उदयपूर शहर ते कोलकाता अनन्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमधील माधोपूर येथील गुज्जर सामाजाच्या वतीने 8 फेब्रुवारीपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी तंबू लावून रेल्वे रुळावर तळ ठोकला आहे. महिला देखील मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्याचा परिणाम उत्तर भारतात जाणार्‍या रेल्वे गाड्यांवर झाला असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More