राज्यात निर्बंध काळात सार्वजनिक वाहतुकीवर काय परिणाम होणार? सरकारकडून खुलासा – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात निर्बंध काळात सार्वजनिक वाहतुकीवर काय परिणाम होणार? सरकारकडून खुलासा

मुंबई – कोविड -19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  5 एप्रिल रोजी निर्बंध आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटींसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विमानतळावर आवश्यक त्या मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी अनुषंगिक सेवांचा समावेश आहे.

परवानगी असलेल्या उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक कामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच उत्पादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या तसेच तयार झालेले उत्पादन पाठविण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कार्यालयीन प्रक्रियेला सुद्धा परवानगीचा समावेश यामध्ये आहे.

पाचशेपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या उद्योगांनी आपल्या कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त क्वारंनटाईन सेंटर उभारावे. ज्या उद्योगांनी अशी सुविधा आपल्या कॅम्पस बाहेर केली असेल त्यांनी संक्रमित कर्मचाऱ्यास त्या ठिकाणी हलविताना तो कोणाच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

कृषी विषयक कामे सुव्यवस्थित सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून सूचीबद्ध केलेल्या कृषी क्षेत्राशी संबंधित इतर सेवा ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक सुविधा, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती यांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे.

चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे.

पुढील सेवा आता आवश्यक सेवा अंतर्गत समाविष्ट केल्या जातील

सेबीने मान्यता दिलेल्या  बाजारातील मूलभूत सुविधा संस्था जसे की स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ.

दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक अश्या दुरुस्ती/ देखभाल विषयक बाबी.

सी. गॅस सिलेंडरचा पुरवठा असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात निर्बंध काळात सार्वजनिक वाहतुकीवर काय परिणाम होणार? सरकारकडून खुलासा

मुंबई – कोविड -19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  5 एप्रिल रोजी निर्बंध आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुकाने तीन दिवस चालू ठेवण्याची परवानगी द्या, मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक आदी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी आता न्यायालयाचा आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबई – मुंबई  स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयए कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर खंडणीचा आरोप केला...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

परीक्षा पे चर्चा! परीक्षेला जीवन मृत्यूचा प्रश्न बनवू नका, पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी परीक्षा रद्द करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी, हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

मुंबई – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद – सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री...
Read More