खुशखबर! 72 हजार पदांच्या मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरूवात – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खुशखबर! 72 हजार पदांच्या मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरूवात

मुंबई – राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रियस्तरावरील सुमारे ७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होत आहे. या मेगा भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येवून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.मात्र या भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर हि भरती पुढे ढकलण्यात आली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.

या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.या मेगा भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात काढण्यात येवून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

या  खात्यात असणार  इतक्या जागा –  

आरोग्य खात्यात १० हजार ५६८ पदे

गृह खात्यात ७ हजार १११

ग्रामविकास खात्यात ११ हजार

कृषी खात्यात २५००

सार्वजनिक बांधकाम खात्यात ८ हजार ३३७

नगरविकास खात्यात १५००

जलसंपदा खात्यात ८२२७

जलसंधारण खात्यात २ हजार ४२३

पशुसंवर्धन खात्यात १ हजार ४७

मत्स्य खात्यात ९० पदे भरली जाणार आहेत.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More