#GoldenGlobes ‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक पुरस्कार तर लेडी गागा झाली भावूक! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन विदेश

#GoldenGlobes ‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक पुरस्कार तर लेडी गागा झाली भावूक!

लॉसएंजल्स –  हॉलीवुडमधील सर्वात मानाचा मानला जाणारा गोल्डेन ग्लोब पुरस्काराचे आयोजन सोमवार ७ जानेवारी रोजी करण्यात आले होते. यंदा गोल्डन ग्लोब पुरस्कारात अनेक धक्कादायक निकाल लागले असून, ‘ग्रीन बुक’ या कालनाटय़ाधारित चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या तीन प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारली आहे.

अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. भारतीय प्रमाणवेळेनुसार ७ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता या अवॉर्डच्या रंगारंग सोहळ्याला सुरुवात झाली. यंदा कॅलिफोर्नियामध्ये या सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे.अँडी सॅमबर्ग व सँड्रा ओह यांनी या हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमाचे संचालन केले. या सोहळ्यात लेडी गागाने ‘A Star Is Born’ या चित्रपटातील  Shallowया गाण्यासाठी ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीत अवॉर्ड जिंकला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर लेडी गागा काहीशी भावूक झाली. म्युझिक इंडस्ट्रीत महिलांना फार गंभीरपणे घेतले जात नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, असे ती म्हणाली. अवॉर्ड जिंकल्यानंतरचा तिचा व्हिडिओ तूर्तास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते

 • * सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाटय़)- बोरेमियन रापसोडी
 • * सर्वोत्कृष्ट चित्रपट ( संगीत व विनोद)- ग्रीन बुक
 • * सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अल्फान्सो क्युरॉ- रोमा
 • * सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटय़)- ग्लेन क्लोज (दी वाईफ)
 • * सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाटय़)- रामी मलेक (बोहेमियन रापसोडी)
 • * सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सांगितिक व विनोदी) – ऑलिव्हिया कोलमन ( द फेव्हराइट)
 • * सर्वोत्कृष्ट अभिनेता  (सांगितिक व विनोदी)-ख्रिस्तीयन बेल (व्हाइस)
 • * सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- रेगिना किंग (इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक)
 • * सर्वोत्कृष्ट सहअभिनेता-महेरशाला अली (ग्रीन बुक)
 • * सर्वोत्कृष्ट पटकथा- निक व्हॅलेलोंगा, ब्रायन क्युरी व पीटर फॅरेली (ग्रीन बुक)
 • * सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट- स्पायडर मॅन- इनटू दी स्पायडर व्हर्स
 • * सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट- रोमा
 • * सर्वोत्कृष्ट मूळ संगीत- जस्टीन हुरवित्झ (फर्स्ट मॅन)
 • * सर्वोत्कृष्ट मूळ गीत- शॅलो (अ स्टार इज बॉर्न)

दूरचित्रवाणी मालिका

 • नाटय़ – द अमेरिकन्स एफएक्स
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सँड्रा ओह (कििलग फाइव्ह)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता – रिचर्ड मॅडेन (बॉडीगार्ड)
 • सर्वोत्कृष्ट मालिका (सांगीतिक किंवा विनोदी) – दी कोमेन्स्कीर मेथड- नेटफ्लिक्स
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सांगीतिक किंवा विनोदी) – राशेल ब्रॉसनहान (दी माव्‍‌र्हलस मिसेस मेसेल)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता (सांगीतिक किंवा विनोदी) – मायकेल डग्लस (दी कोमेन्स्की मेथड)
 • दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका – दी अ‍ॅसेसिनेशन ऑफ गियानी व्हेर्सेस अमेरिकन क्राइम स्टोरी- एफएक्स.
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका) –  पॅट्रिशिया अरक्वेट ( एस्केप अ‍ॅट डॅनेमोरा)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका) – डॅरेन क्रिस (दी अ‍ॅसेसिनेशन ऑफ गियानी व्हेर्सेस अमेरिकन क्राइम स्टोरी- एफएक्स.)
 • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री  (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका) – पॅट्रिशिया क्लार्कसन (शार्प ऑब्जेक्ट्स)
 • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता- बेन विशॉ (अ व्हेरी इंग्लिश स्कँडल)

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More