सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच, आजचा भाव पाहा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच, आजचा भाव पाहा

मुंबई – जागतिक लॉकडाऊनमुळे कमॉ़डिटी बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतोय. ५६ हजाराच्या जवळपास गेलेल्या सोन्याची आता घसरण होत असून आज गुरुवारी  सोन्याच्या दरात ६८४ रुपयांची घसरण झाली असून तो ५१९३८ रुपये झाला आहे.

सततच्या बदलत जाणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमत आज सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात १६०० रुपयांची उलथापालथ दिसून आली. इंट्रा डेमध्ये सोने ५१८६५ रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले. तर ५२५५० रुपयांचा स्तर गाठला होता. चांदीच्या दरात देखील ९८३ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या चांदीचा भाव एक किलोला ६६ हजार ९८० रुपये आहे.

रशियाने कोरोनाप्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन जोरात सुरु केले आहे. तर इतर देशांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने आणि चांदीच्या वाढीला ब्रेक लागला आहे. रशियात करोना लस तयार झाल्याने या महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारातदेखील सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ११६.९६ डॉलरने कमी झाला. जागतिक बाजारात सोने दर प्रती औंस ५.६७ टक्क्यांनी घसरून १९४४.४५ डॉलरवर बंद झाला होता. तर डिसेंबरचा सोन्याचा भाव ५.६८ टक्क्यांनी घसरून १९५३.७० डॉलर झाला होता. सध्या सोन्याचा भाव १९४० डॉलर प्रती औंस आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच, आजचा भाव पाहा

मुंबई – जागतिक लॉकडाऊनमुळे कमॉ़डिटी बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतोय. ५६ हजाराच्या जवळपास गेलेल्या सोन्याची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

आजमगड – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच...
Read More
post-image
महाराष्ट्र

खारघरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई – ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी महम्मद सुलेमान याने खारघरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. अद्याप सुलेमानच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तृतीय; छोट्या शहरांच्या यादीत कराड अव्वल

नवी दिल्ली – स्वच्छता सर्वेक्षणात यंदा सलग तिसऱ्या वर्षी मध्य प्रदेशातील इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीत सुरत दुसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्रातील...
Read More
post-image
देश महाराष्ट्र

कोरोनावर कडुलिंब! भारतात संशोधन; २५० लोकांवर होणार चाचणी

नवी दिल्ली – कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक, वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. आयुर्वेददेखील आपल्यापरीने त्यासाठी शिकस्त करत आहे. त्यातच आता प्रथमच...
Read More